
मुंबईच्या प्रभादेवी येथील इंडियाबुल्स इमारतीत आज पवार कुटुंबातील आणखी एक आनंदाचा क्षण साजरा झाला. युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला. या खास प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. या सोहळ्याने पवार कुटुंबाच्या एकजुटीचे आणि कौटुंबिक बंधनांचे दर्शन घडवले.