अखेर ठरलं! आदित्य ठाकरे 'या' मतदारसंघातून लढणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

वरळीच्या शिवसैनिकांना तयारीला लागण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. आदित्य ठाकरेंना एक लाखापेक्षा जास्त मतांनी जिंकून आणणार निर्धार व्यक्त करण्यात आला.

मुंबई : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा आमदार अनिल परब यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात केली. 

वरळीच्या शिवसैनिकांना तयारीला लागण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. आदित्य ठाकरेंना एक लाखापेक्षा जास्त मतांनी जिंकून आणणार निर्धार व्यक्त करण्यात आला. आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढविल्यास ते ठाकरे घराण्यातून निवडणूक लढणारे पहिले सदस्य असतील.

या मेळाव्याला खासदार धैर्यशील माने, आमदार सुनिल शिंदे, माजी आमदार सचिन अहिर उपस्थित होते. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात जनाआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून फिरण्यास सुरवात केली आहे. तेव्हाच त्यांच्या निवडणूक लढण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuvasena chief Aditya Thackeray may be contest election in Worli assembly seat