युवासेनेची अमृता फडणवीसांच्या 'त्या' ट्विटवर सडकून टीका.... म्हणे, सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर !!

तुषार सोनवणे
Monday, 3 August 2020

राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करून सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणात उडी घेतली आहे. त्यांच्या ट्वीटनंतर य़ुवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी अमृता फडणवीसांवर टीका केली आहे.

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मोठे राजकीय वादंग उभे राहिले आहे. आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिस आणि बिहार पोलिस चौकशी करीत आहेत. त्यातच आज बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी क्वॉरंटाईन केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करून याप्रकरणात उडी घेतली आहे. त्यांच्या ट्वीटनंतर य़ुवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी अमृता फडणवीसांवर टीका केली आहे.

सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी अमृता फडणवीसांचे मोठे व्यक्तव्य; वाचा काय केले ट्विट

अमृता फडणवीस यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणतात, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असे वाटते की, मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहण अजिबात सुरक्षित नाही. या ट्विट सोबत त्यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅग वापरले आहेत.

अमृता फडणवीसांच्या ट्विटवरून चांगलाच वाद पेटला आहे. युवासेनेचे वरूण सरदेसाईंनी अमृता फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विट करीत म्हटले की, तुम्ही आणि तुमचे कुटूंबिय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन असतात आणि त्यांच्यावर असा नीच आरोप करता?

वरुण सरदेसाई यांनी पुन्हा ट्वीट करून भाजपवर टीका केली. त्यात त्यांनी बिहार निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन भाजप राजकारण करीत असल्याचे आरोप केला आहे. महाराष्ट्रद्रोही भाजप असा हॅशटॅगही त्यांनी लावला आहे.  

सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर अनेक चर्चा आणि तर्क वितर्कांना उधान आले आहे. त्यामुळे रोज याप्रकरणात नविन अपडेट समोर येत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीत आता राजकीय वाद देखील पेटलेला दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuvasena's criticism of Amrita Fadnavis's tweet