प्लास्टिकमुक्तीसाठी नवी मुंबईत ‘झोला ब्रिगेड’

प्लास्टिकमुक्तीसाठी नवी मुंबईत ‘झोला ब्रिगेड’
प्लास्टिकमुक्तीसाठी नवी मुंबईत ‘झोला ब्रिगेड’

नवी मुंबई : शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी नवी मुंबईतील काही पर्यावरणप्रेमी पुढे सरसावले आहेत. शहरात प्लास्टिक पिशव्यांचा किरकोळ विक्रेत्यांकडून अधिक वापर केला जात असल्याने, या पर्यावरणप्रेमींनी एकत्र येऊन ‘झोला ब्रिगेड’ स्थापन केली आहे. या ब्रिगेडमार्फत वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील विक्रेत्यांना कापडी पिशव्या देण्यात आल्या.

‘झोला ब्रिगेड’ची संकल्पना शिवानी ओझा, कल्पना छत्रे, रोहित मल्होत्रा, पूनम मिश्रा यांची आहे. वापरलेल्या पण स्वच्छ धुतलेल्या कॉटनच्या जुन्या चादरी, साड्या, ओढण्या लोकांकडून जमा करायच्या आणि त्यापासून कापडी पिशव्या बनवायच्या व त्या विक्रेत्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून द्यायच्या. जेणेकरून काही स्वयंसेवी गटांनाही रोजगाराचे माध्यम उपलब्ध होईल. याबाबत शिवानी ओझा यांनी सांगितले, की प्लास्टिक तत्काळ हद्दपार होणे अशक्‍य आहे. शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यायला हवा. विक्रेत्यांना प्लास्टिकला पर्याय ठरेल, अशा पिशव्या अल्प दरात उपलब्ध करायला हव्यात. गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त त्यांनी नुकतेच अशा ५५०  पिशव्या वाशी सेक्‍टर ९ ए मधील फळ आणि भाजी विक्रेत्यांना दिल्या. या उपक्रमात शहरातील ‘विमेन ऑफ विसडम’ ग्रुपही सहभागी झाला होता. या वेळी मॉडेल, ॲक्‍टर कोमल मिरानदेखील या उपक्रमाला पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित होत्या. 

या उपक्रमाला विक्रेत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. कापडी पिशव्यांची मागणीदेखील वाढत आहे. आम्ही स्वयंसेवी गटांच्या मदतीने जुन्या, दान केलेल्या साड्यांपासून पाच हजार पिशव्या तयार करण्याचा विचार करत आहोत. त्याकरता जुने कपडे, देणगी, दान स्वरूप देण्याची मोहिमही सुरू करत आहोत. 
- शिवानी ओझा, झोला ब्रिगेड.

विमेन ऑफ विसडम ग्रुपच्या महिलांनी शहर प्लास्टिकमुक्त करण्याकरिता आमचाही खारीचा वाटा असेल, अशी शपथ घेतली. आम्ही ‘झोला ब्रिगेड’ला या उपक्रमात जुन्या साड्या गोळा करण्यात मदत करत असून, त्यांनी बनवलेल्या पिशव्या आम्ही १९ ऑक्‍टोबर रोजी आमच्या ‘व्वाव मेला’मध्ये कमी दरात उपलब्ध करत आहोत.
- जसमिन अगरवाल, अध्यक्ष, विमेन ऑफ विसडम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com