Crime News: धक्कादायक! बहिणीला त्रास देतो म्हणून भावाने प्रियकराची चाकूने भोसकून केली हत्या

Crime News: धक्कादायक! बहिणीला त्रास देतो म्हणून भावाने प्रियकराची चाकूने भोसकून केली हत्या

Published on

नागपूर: बहिणीला त्रास देणाऱ्या प्रियकराचा पीडितेच्या भावाने मित्राच्या मदतीने चाकूने वार करीत खून केला. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रमानगर परिसरात मंगळवारी (ता.२७) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

निखील शाहू उके (वय २८ रा. रमानगर) असे मृताचे नाव असून हिमांशू प्रदीप मून (वय २८, रा. रमानगर), अंकीत उर्फ ॲनी वाघमारे (वय २०), विशाल उर्फ बब्बू काल्या (वय २० रा. रमानगर) अशी आरोपींची नावे आहेत.

Crime News: धक्कादायक! बहिणीला त्रास देतो म्हणून भावाने प्रियकराची चाकूने भोसकून केली हत्या
Lok Sabha 2024: लोकसभेवरून रणसंग्राम; काँग्रेसने हट्ट सोडला नाही, तर...; राष्ट्रवादीच्या आमदाराचा इशारा

निखीलचे हिमांशूच्या बहिणीसोबत चार वर्षांपूर्वी प्रेम जडले. दोघेही प्रेमाच्या आनाभाका घेत होते. ही बाब घरच्यांना माहिती पडली. त्यांनीही दोघांचे लग्न करण्याचे ठरविले. दरम्यान अडीच महिन्यांपूर्वी हिमांशूच्या बहिणीने निखीलशी संबंध तोडले.

त्यानंतर ती निखीलचा फोनही उचलत नसे. त्याने तिला भेटण्याचा प्रयत्न केला. पण ती स्पष्ट नकार द्यायची. ही बाब घरच्यानाही माहिती पडली. त्यातून हिमांशूने निखीलला भेटून समजाविण्याचा प्रयत्न केला.

मंगळवारी निखीलने हिमांशूला रात्री उशिरा चर्चेसाठी बोलाविले. तिथे बहिणीच्या मागे लागू नको असा इशारा हिमांशूने निखीलला दिला.

Crime News: धक्कादायक! बहिणीला त्रास देतो म्हणून भावाने प्रियकराची चाकूने भोसकून केली हत्या
Nagpur Crime: नोकरीचे आमिष दाखवत गुंगीचे औषध देऊन महिलेवर सामूहिक बलात्कार

त्यावरून दोघांचेही भांडण झाले. हिमांशूसोबत असलेले अंकीत आणि विशाल यांनी निखीलला मारहाण केली आणि हिमांशूने चाकू काढून त्याच्या पोटावर सपासप वार केले. यात निखील गंभीर जखमी झाला. त्यामुळे तिघेही पळून गेले.

त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. अजनी पोलिसांचा ताफा आणि गुन्हेशाखेचे अधिकारीही घटनास्थळी पोहचले. त्यांनी तिघांविरोधात हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. बुधवारी सकाळी निखीलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत तिघांनाही अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com