
नांदेड - जिल्हा परिषदेतील गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग ४) च्या कर्मचाऱ्यांच्या वर्ष २०२५ मधील सर्वसाधारण बदल्या मंगळवार (ता.६) पासून समुपदेशन प्रक्रियेद्वारे सुरू झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी वित्त, सामान्य प्रशासन व जलसंधारण विभागातील एकूण १०८ कर्मचाऱ्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या उपस्थितीत बदल्या करण्यात आल्या.