esakal | २१४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती गंभीर, गुरुवारी नऊ जणांचा मृत्यू, १४८ जण बाधित; १५४ रुग्ण कोरोना मुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

जिल्ह्यातील विविध कोविड सेंटवर कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आपल्यामुळे घरातील लहान थोरांना त्रास नको म्हणून साधारण लक्षणे दिसताच लोक कोरोना चाचणी करुन घेण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसून येतो. 

२१४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती गंभीर, गुरुवारी नऊ जणांचा मृत्यू, १४८ जण बाधित; १५४ रुग्ण कोरोना मुक्त 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड ः दिवसेंदिवस कोरोना आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. बुधावारी (ता.२६) घेण्यात आलेल्या स्वँबचा गुरुवारी (ता.२७) ४८० जणांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३१३ निगेटिव्ह, १४८ जण पॉझिटिव्ह आढळुन आले. तर दिवसभात १५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असली तरी, दुसरीकडे उपचारा दरम्यान नऊ जणांचा मृत्यू अन २१४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील विविध कोविड सेंटवर कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आपल्यामुळे घरातील लहान थोरांना त्रास नको म्हणून साधारण लक्षणे दिसताच लोक कोरोना चाचणी करुन घेण्यासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसून येतो. 
बुधवारी घेण्यात आलेल्या आरटीपीसीआर व अँन्टीजन टेस्टच्या माध्यमातून १४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या पाच हजार ६४० इतकी झाली आहे. गुरुवारी श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातील चार, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील चार व खासगी एक अशा एकुण नऊ रुग्णांचा कोरोनावर उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. आता पर्यंत २०६ रुग्ण कोरोना आजाराने दगावली आहेत. 

हेही वाचा- Video-नांदेडला आईसक्रीम कोल्ड स्टोरेज आगीत जळून खाक ​

१५४ रुग्णांनी कोरोनावर मात 

दुसरीकडे विष्णुपुरी शासकीय रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, पंजाब भवन, हदगाव, अर्धापूर, धर्माबाद, लोहा, देगलूर, बिलोली, मुखेड, नायगाव आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १५४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता पर्यंत तीन हजार ८९४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

नऊ बाधितांचा मृत्यू ः 

नगीनाघाट नांदेड पुरुष (वय-६७), सिडको नांदेड पुरुष (वय-७५), धर्माबाद तालुक्यातील धानोरा पुरुष (वय-६५), देगलूर पुरुष (वय-७६), लोहा पुरुष (वय-७०), वसंतनगर नांदेड महिला (वय-४०), रविनगर नांदेड महिला (वय-६५), देललूर तालुक्यातील करडखेड पुरुष (वय-५८) व गुरुद्वारा परिसरातील एक पुरुष (वय- ५५) या नऊ बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- कृष्णूरच्या पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीतील जुगार, कुंटुर पोलिसांनी सहा जुगाऱ्यांना केली अटक ​

गुरुवारी या भागात आढळुन आले कोरोना रुग्ण 

बाधितांमध्ये नांदेड मनपा क्षेत्र - ७१, नांदेड ग्रामीण - चार, अर्धापूर- एक, देगलूर - चार, किनवट - ११, नायगाव - एक, मुदखेड- चार, लोहा- दहा, कंधार- १२, उमरी- तीन, हदगाव - तीन, धर्माबाद- दहा, मुखेड- सात, परभणी- एक, अकोला- एक, लातूर- एक, हिंगोली - एक असे एकुण १४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती 

सर्वेक्षण- एक लाख ५१ हजार ४६७ 
घेतलेले स्वॅब- ४२ हजार ५७० 
निगेटिव्ह स्वॅब- ३४ हजार ७२१ 
गुरुवारी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- १४८ 
गुरुवारी मृत्यू- नऊ 
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- पाच हजार ६४० 
एकूण मृत्यू संख्या- २०६ 
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- तीन हजार ८९४ 
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- एक हजार ५०३ 
गुरुवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- ३४१ 
गुरुवारी रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- २१४