Legal Action: हदगाव तालुक्यातील कोथळा येथे पैनगंगा नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तहसीलदार सुरेखा नांदे यांनी धाडसत्र राबवत वाळू, ट्रॅक्टर व यंत्र जप्त केले.
हदगाव : या तालुक्यातील कोथळा पैनगंगा नदीपात्रातून वाळू उपसा यंत्र, ट्रॅक्टर आणि तीस ब्रॉस वाळू जप्त केल्याची कारवाई तहसीलदार सुरेखा नांदे यांनी गुरुवारी (ता.५) दुपारी १२ वाजता सुमारास केली. या घटनेमुळे वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.