esakal | नांदेड जिल्ह्यात ३० मिली मिटर पावसाची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

काही दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे शहरातील विष्णुपुरी जलाशय ७० टक्के भरला आहे. यामुळे शहरवाशियांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. मात्र जिल्ह्यातील ४५ महसुल मंडळात पावसाची प्रतिक्षा कायम आहे, तर हिमायतनगरात अतिवृष्टीची नोंद झाली.

नांदेड जिल्ह्यात ३० मिली मिटर पावसाची नोंद

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यातील बहुतेक भागात गुरुवारी (ता. नऊ जुलै) मध्यरात्री दमदार पाऊस झाला. रात्रीतुन झालेल्या पावसाची ३० मिली मिटर इतकी नोंद झाली असल्याची माहिती नांदेड जिल्हा हवामान विभागाचे समन्वयक बालाजी कच्छवे यांनी शुक्रवारी (ता.दहा) माहिती दिली. नांदेड जिल्ह्यात गुरुवारी दमदार पाऊस झाल्याने शेतकरी काही प्रमाणात सुखावले आहे.  

शेतीसाठी २० ते ३० मिली मीटर इतका पाऊस रात्रभरात झाला तर तो उपयुक्त मानला जातो. अर्थात हे पाणी शेत जमीनीत झीरपन्यास उपयुक्त ठरते. परंतु यापेक्षा अधिक पाऊस झाल्यास ते पावसाचे पाणी शेतीतून वाहून जाते. ५० मिली मीटरपेक्षा आधिक पावसाची नोंद झाली तर शेत जमीनीतील सुपिकता खरडली जाते. तसेच नदीनाल्यांना पुर येतो, असे तज्ज्ञांकडून ठोकताळे मांडले जातात.

हेही वाचा-  कौतुकास्पद : सफाई कामगाराच्या मुलांनी नाव कमावलं, तिघेही झाले एमबीबीएस ​

सरसम महसुल मंडळात तीसऱ्यांदा अतिवृष्टी

नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी (ता.दहा) सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात ८० महसुल मंडळापैकी ६ महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर दहा महसूल मंडळात ६० मिली मीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे सांगितले जात आहे. यात नांदेड तालुक्यातील लिंबगाव महसूल मंडळात सर्वाधिक ८५ मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ हिमायतनगर तालुक्यातील सरसम ७७ मिली मीटर इतका पाऊस झाला आहे. या पंधरवड्यात सरसम महसुल मंडळात तीसऱ्यांदा अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शुक्रवारी सकाळी अन्य महसुल मंडळात पुढील प्रमाणे पावसाची नोंद झाली आहे.

हे वाचलेच पाहिजे- Video - नांदेडकरांनो सावधान; घराबाहेर पडताना घ्या काळजी.... ​
 

महसूल मंडळ पाऊस (मिलीमिटरमध्ये)
जलधरा 73
जवळगाव 72
तरोडा बुद्रुक 70
बोधडी 67
दाभड 63
अर्धापूर ६२
नांदेड ग्रामीण 62
तामसा 61
हिमायतनगर 55
मनाठा 45
आष्टी 44
मोघाळी 40
मातुळ 40
देहली 40
शिवणी 35
वजीराबाद 38
इस्लामपूर 37
वानोळा 36
मांडवी 36
हदगाव 33
तुप्पा 31
वसरणी  30

बारड 

30

विष्णुपूरी  29
 वाई  28
मुगट 27
नांदेड शहर 26
मुदखेड 25
पिंपरखेड 24
निवघा 24
किनवट 22
मालेगाव 22
तळणी 20
   

मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील अन्य ४५ महसूल मंडळात चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे.