
नांदेड : जुन्या नांदेडमधील ब्रह्मपुरी चौफाळा येथे असलेल्या श्री विठ्ठलेश्वर देवस्थानात यंदाही आषाढी उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नांदेड शहरातील गोदाकाठी वसलेले पहिले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर असून, येथे तीनशे वर्षांहून अधिक जुनी परंपरा लाभली आहे.