Nanded Corona Update : शनिवारी ३०४ रुग्ण कोरोना आजारातून मुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

304 patients released corona disease nanded
नांदेड : शनिवारी ३०४ रुग्ण कोरोना आजारातून मुक्त

नांदेड : शनिवारी ३०४ रुग्ण कोरोना आजारातून मुक्त

नांदेड : जिल्ह्यातील बाधितांची संख्या कधी कमी तर कधी जास्त होत आहे. दुसरीकडे उपचार सुरु असलेल्या गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील सुरु आहे. शनिवारी (ता.पाच) प्राप्त एक हजार ४१८ अहवालापैकी १३१ कोरोनाबाधित आले आहेत. दिवसभरात ३०४ रुग्ण आजारातून मुक्त झाले आहेत. तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजच्या घडीला एक हजार ८२२ रुग्ण उपचार घेत असून यातील चार बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या एक लाख दोन हजार ३६४ एवढी झाली असून यातील ९७ हजार ८६१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या गंभीर आजारी रुग्णांपैकी हदगाव तालुक्यातील शिवाजी नगर येथील ९३ वर्षीय परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील ४७ वर्षीय पुरुषाचा असे दोन व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६८१ आहे.आजच्या बाधितांमध्ये नांदेड महापालिका हद्दीत ७१, नांदेड ग्रामीण चार, धर्माबाद एक, लोहा पाच, बिलोली दोन, कंधार दोन, हदगाव दोन, मुखेड आठ, नायगाव पाच, देगलूर सहा, किनवट दहा, भोकर दोन, यवतमाळ एक, उत्तरप्रदेश एक, जालना एक, अकोला दोन, परभणी तीन, मध्यप्रदेश एक, पंजाब दोन असे एकूण १३१ बाधित आढळले आहेत.

सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी २८, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण एक हजार ७६३, नांदेड महापालिका गृहविलगीकरणात ९९८, देगलूर कोविड सेंटर तीन, खासगी रुग्णालयातील ३० असे एकूण एक हजार ८२२ व्यक्ती उपचार घेत आहेत. त्यापैकी चार बाधितांची प्रकृती गंभीर आहे.

नांदेड कोरोना मीटर

  • एकूण बाधित -एक लाख दोन हजार ३६४

  • एकूण बरे - ९७ हजार ८६१

  • एकूण मृत्यू - दोन हजार ६८१

  • शनिवारी बाधित - १३१

  • शनिवारी बरे - ३०४

  • शनिवारी मृत्यू - दोन

  • उपचार सुरु -एक हजार ८२२

  • गंभीर रुग्ण - चार

Web Title: 304 Patients Released Corona Disease Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top