NEET Exam 2025 : नांदेड जिल्ह्यात ‘नीट’च्या परीक्षेला ३१७ विद्यार्थ्यांची दांडी
Nanded News : नांदेड जिल्ह्यातील ५६ केंद्रांवर रविवारी ‘नीट’ परीक्षा शांततेत पार पडली. १९ हजार १३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर ३१७ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.
नांदेड : जिल्ह्यात ५६ परीक्षा केंद्रांवर रविवारी (ता. चार) ‘नीट’ची परीक्षा दुपारी दोन ते पाच या वेळेत घेण्यात आली. या परीक्षेला एकूण नोंदणी केलेल्या परीक्षार्थींपैकी एकूण १९ हजार १३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर ३१७ विद्यार्थी गैरहजर राहिले.