
पोलिस दलातील ३४ कर्मचारी आता हे महामार्ग पोलिस नागपूर परिक्षेत्र अंतर्गत कार्यरत राहणार आहेत. या सर्वांना गुरुवारी (ता. २४) पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी आपल्या आस्थापनेवरुन कार्यमुक्त केले आहे.
नांदेड : राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (वाहतूक) यांच्या आदेशानुसार जिल्हा पोलिस दलातील पोलिस अमलदार यांची महामार्ग पोलिस विभागात तात्पुरत्या स्वरुपात बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस दलातील ३४ कर्मचारी आता हे महामार्ग पोलिस नागपूर परिक्षेत्र अंतर्गत कार्यरत राहणार आहेत. या सर्वांना गुरुवारी (ता. २४) पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी आपल्या आस्थापनेवरुन कार्यमुक्त केले आहे.
बदली झालेल्या पोलिस आमदारांचे नाव व सध्या कार्यरत पोलिस ठाणे कंसात
रवींद्र साखरकर (कुंटूर), अंकुश वडजे (नांदेड ग्रामीण), सुभाष अलोने (स्थागुशा), अर्जुनसिंग ठाकूर (भाग्यनगर), सचिन खेडकर (जिवीशा), सयाजी कदम (बीडीडीएस), बालाजी हिंगणकर (स्थागुशा), संदीप चटलेवार (अर्धापूर), गणपत शेवाळकर (माहूर), संतोष निलेवार (पोलिस मुख्यालय), सुधाकर रणवीरकर (एटीसी), सुनील पाचपोळे (जिवीशा), गजानन डवरे (शहर वाहतूक शाखा), सय्यद सत्तार जमीर (बीडीडीएस), गुरप्रीतसिंग मान (बीडीडीएस), ज्ञानेश्वर आवातीरक (पोलिस मुख्यालय), गणेश शेळके (पोलिस मुख्यालय), राजीव धाडवे (कंधार), नितीन धापसे (पोलीस मुख्यालय), अब्दुल गणी अब्दुल सलाम (शिवाजीनगर), लक्ष्मण फुलारी (पोलिस मुख्यालय), परमेश्वर श्रीमंगले (पोलिस मुख्यालय), संभाजी मोरे (आर्थिक गुन्हे शाखा), नितीन भुताळे (वजीराबाद), मंगेश जोंधळे (स्थागुशा), अविनाश धुमाळ (शहर वाहतूक शाखा), अमोल सातारे (पोलिस मुख्यालय), मोहम्मद जी लाल मोहम्मद माणिकपेठ (ईतवारा), सुनील पोवळे (किनवट), शेख उजेर जहूर शेख (जिवीशा), सतीशकुमार श्रीवास्तव (हदगाव), महेश कात्रे (पोलिस मुख्यालय), संतोष वागतकर (उमरी) आणि सरदार जसप्रीतसिंग शाहू (वजीराबाद) यांची बदली महामार्ग पोलिस नागपूर परिक्षेत्रात करण्यात आली आहे. बदली झालेले सर्व अंमलदार हे महामार्ग सुरक्षा विभागात काम करण्यासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम नसल्यास त्यांना मूळ घटकात त्वरित प्रत्यावर्तीत करण्यात येईल याबाबतची समाज संबंधितांना देण्यात आली आहे. बदली झालेल्या अमलदारांनी प्रतिनियपक्तीच्या ठिकाणी रुजु होऊन या कार्यालयास कळवावे असेही आदेशात नमुद केले आहे.