Mission Udaansakal
नांदेड
Mission Udaan : साडेतीन हजार तरुणांना मिळाला रोजगार; नांदेड पोलिसांच्या ‘मिशन उडाण’मध्ये दिले नियुक्तिपत्र
Nanded Police : नांदेड पोलिसांच्या ‘मिशन उडाण’ अभियानात ३५०० सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मेळाव्यात नियुक्तिपत्रे देण्यात आली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश बेरोजगारी कमी करणे आणि तरुणांना रोजगार मिळवून देणे आहे.
नांदेड : नांदेड जिल्हा पोलिस दलाच्यावतीने मिशन उडाण अभियानाअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे आयोजन पोलिस कवायत मैदानात शनिवारी (ता. तीन) करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्यातील ३५०० सुशिक्षित बेरोजगारांना नियुक्तिपत्रे देण्यात आली.