
कंधार : कंधार-बारूळ-नरसी मार्गावरील कंधार तालुक्यातील मानसपुरी-बाचोटी गावाजवळील तीन पुलाची उंची कमी असल्याने ते पाण्याखाली जातात. परिणामी, ५० गावांचा संपर्क तुटतो. अनेक नागरिक, विद्यार्थी, शेतकरी पुलावरून वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करीत आहेत. पावसाळ्यात नेहमीच उद्भवणाऱ्या या गंभीर बाबीकडे आता तरी लक्ष देऊन रस्त्याच्या रुंदीकरणासह धोकादायक पुलांची उंची वाढवण्याची मागणी होत आहे.