esakal | भोकर विभागातील थकबाकीमुक्त 53 महिला शेतकऱ्यांचा केला सन्मान

बोलून बातमी शोधा

file photo

सभापती नीता रावलोड यांच्या हस्ते सन्मानपत्राचे वाटप

भोकर विभागातील थकबाकीमुक्त 53 महिला शेतकऱ्यांचा केला सन्मान
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्यभरात सुरू असलेल्या महाकृषी ऊर्जा पर्वाचा जागर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भोकर पंचायत समिती सभापती नीता रावलोड यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला.

कृषी ऊर्जा पर्वाच्या निमित्ताने शेतकरी महिला, महिला सरपंच, महावितरणच्या दामिनी अर्थात महिला जनमित्र त्याचबरोबर महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठबळ मिळावं याकरिता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महावितरणच्या वतीने  कृषिपंपाच्या थकबाकीतून मुक्त झालेल्या 53 शेतकरी महिलांचा प्रातिनिधिक स्वरुपात सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.

जागतिक महिला दिनानिमित्त आपले कृषि बिल निरंक केलेल्या 53 महिला ग्राहकांचा सत्कार केला. यात उमाबाई बालाजीराव पाटील भोकर, शकुंतलाबाई शेषेराव कदम, ज्योती आनंद जोशी भोसी, लिलाबाई किशन पिंपळकोठा, गंगाबाई धर्माजी, चंद्रभागा रघुनाथ सोनटक्के चितगिरी, धुपातबाई संतुका पाकलवाड या शेतकरी महिलांचा भोकर पंचायत समितीचे सभापती नीता रावलोड यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच महिला कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यकारी आभियंता गोपुलवाड, उप कार्यकारी अभियंता शेख, कुळकर्णी उप व्यवस्थापक तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.