

नांदेड : कृषी अधिकारी कार्यालयातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सूक्ष्म सिंचन योजनेचे बनावट दस्तऐवज तयार करून तब्बल सहा कोटी रुपये हडपल्याची घटना नांदेड येथे घडली. याप्रकरणी कृषी पर्यवेक्षक, वितरकांसह १४ जणांवर नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला. या प्रकरणामुळे कृषी विभागातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.