esakal | नांदेडला बुधवारी ६५ जण कोरोना पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

मंगळवारी (ता. २९) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालाचा बुधवारी (ता. 30) ९६९ स्वॅब प्राप्त झाले. त्यामधील ८९४ निगेटिव्ह तर ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २१ हजार ४२५ एवढी झाली, असून यातील २० हजार ३३३ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे.

नांदेडला बुधवारी ६५ जण कोरोना पॉझिटिव्ह

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण आणि रुग्णालयातून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांच्या संख्येत बुधवारी (ता.३०) किंचित वाढ झाली आहे. प्राप्त झालेल्या अहवालानुसार रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४० रुग्ण बरे झाले आहेत. गंभीर रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला तर ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

मंगळवारी (ता. २९) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालाचा बुधवारी (ता. 30) ९६९ स्वॅब प्राप्त झाले. त्यामधील ८९४ निगेटिव्ह तर ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २१ हजार ४२५ एवढी झाली, असून यातील २० हजार ३३३ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. सध्या ३१८ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील ११ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

हेही वाचा- नांदेड : जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटना वाढल्या, मात्र सापाला मारु नका सर्पमित्रांचे आवाहन ​

४० रुग्ण औषधोपचारानंतर बरे

मंगळवारी (ता. २९) लोहा तालुक्यातील देऊळ गल्ली येथील पुरुष (वय ८३) या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी (ता. ३०) उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत जिल्ह्यातील ५७३ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बुधवारी बरे झालेल्या बाधितांमध्ये विष्णुपुरीच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात - दहा, महापालिका अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण -१४, जिल्हा शासकीय रुग्णालय - दोन, हदगाव - पाच, कंधार - एक, मुखेड - तीन व खासगी रुग्णालयातील पाच असे ४० रुग्ण औषधोपचारानंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली आहे.

हेही वाचा- सावधान - आॅनलाइन फसवणुक करून काढले अडीच लाख रुपये

अशी आहे जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या

बुधवारी बाधितांमध्ये नांदेड महापालिका क्षेत्रात १६, नांदेड ग्रामीण - तीन, कंधार - एक, लोहा - एक, मुखेड - चार, बिलोली - तीन, देगलूर - नऊ,भोकर - एक, नायगाव - १६, हदगाव - तीन, उमरी - एक, किनवट - चार, लातूर - तीन असे एकूण ६५ बाधित आढळले. जिल्ह्यात ३१८ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात विष्णुपुरी शासकीय रुग्णालय १४, जिल्हा शासकीय रुग्णालय १८, जिल्हा रुग्णालय (नवी इमारत), नांदेड महापालिका अंतर्गत गृह विलगीकरण १४०, जिल्हा रुग्णालयातील नवीन इमारतीत २५, मुखेड १६, देगलूर १७, हदगाव एक, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण ६३, हैद्रराबाद संदर्भीत एक व खासगी रुग्णालय २० रुग्ण आहेत.

नांदेड कोरोना मीटरः

एकूण पॉझिटिव्ह - २१ हजार ४२५
एकूण बरे - २० हजार ३३३
एकूण मृत्यू - ५७३
बुधवारी पॉझिटिव्ह - ६५
बुधवारी बरे - ४०
बुधवारी मृत्यू - एक
बुधवारी प्रलंबित स्वॅब - ६३१
उपचार सुरु -३१८
अतिगंभीर रुग्ण -११