Nanded News sakal
नांदेड
Nanded News : नांदेड जिल्ह्यात दोन वर्षांत आढळले ६८८ डेंगीचे रुग्ण; घेतले होते ३६०८ रक्ताचे नमुने, खबरदारी घेण्याचे आवाहन
Dengue Alert : नांदेड जिल्ह्यात २०२२ पासून आतापर्यंत डेंगीचे ६८८ रुग्ण आढळले असून, वेळीच निदान आणि उपचार झाल्यामुळे मृत्यू एकही झालेला नाही. नागरिकांना पाणी साठवू नये, डासांची वाढ रोखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड/नायगाव : वर्ष २०२२ ते आजपर्यंत जिल्ह्यात ३६०८ रक्ताचे नमुने तपासण्यात आले, त्यापैकी ६८८ डेंगी रुग्ण आढळून आले. परंतु, वेळीच उपचाराचे निदान झाल्यानंतर उपचार केल्याने डेंगीच्या आजाराने एकाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.