

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे कै. वसंतराव नाईक चौकात उभारण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या नऊ फूट उंच पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व परिसर सुशोभीकरण कामाचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी (ता. २६) करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.