esakal | कोरोना बाधितांपैकी ९५ टक्के रुग्ण घरी परतले, गुरुवारी ३६ पॉझिटिव्ह ः ४३ रुग्ण कोरोनामुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

गुरुवारी (ता. १९) एक हजार ३५८ जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी एक हजार २२३ निगेटिव्ह, ३६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १९ हजार ७७३ वर पोहचली आहे.

कोरोना बाधितांपैकी ९५ टक्के रुग्ण घरी परतले, गुरुवारी ३६ पॉझिटिव्ह ः ४३ रुग्ण कोरोनामुक्त 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - देशात काही ठिकाणी संभाव्य कोरोनाची लाट पसरत असल्याचे दिसून येत आहे. मात्र नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्येच घट होत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात ४३ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले, तर ३६ नवीन रुग्णांची भर पडली असून, आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णापैकी ९५ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याचे अहवालावरुन दिसून येते.

बुधवारी (ता. १८) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबचा गुरुवारी (ता. १९) एक हजार ३५८ जणांचा अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी एक हजार २२३ निगेटिव्ह, ३६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १९ हजार ७७३ वर पोहचली आहे. त्यातील १९ हजार ७८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्याभरात २५८ बाधित रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 

हेही वाचा- यंदाची सप्तपदीही कोरोनाच्या चक्रव्युहात, ३० नोव्हेंबरला पहिला विवाह मुहूर्त​

बाधितांची संख्या १९ हजार 

उपचार सुरू असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दिवसभरात नांदेड महापालिका क्षेत्रात - २१, नांदेड ग्रामीण- पाच, मुदखेड - तीन, अर्धापूर - एक, हदगाव - तीन, देगलूर - एक, मुखेड - एक आणि हिंगोली - एक असे ३६ नवीन बाधित रुग्ण आढळुन आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या १९ हजार ७७३ इतकी झाली आहे. विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात १७० तर गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये ७९ खाटा रिकाम्या आहेत. 

हेही वाचले पाहिजे - नांदेड : दुचाकीस्वार चोरटे सैराट, शहरातील तीन महिलांचे गंठण लंपास ​

कोरोना मीटर ः 

गुरूवारी पॉझिटिव्ह - ३६ 
गुरूवारी कोरोनामुक्क - ४३ 
गुरूवारी मृत्यू - शुन्य 
एकूण बाधित रुग्ण - १९ हजार ७७३ 
एकूण कोरोनामुक्त - १९८ हजार ७८२ 
एकूण मृत्यू - ५४३ 
उपचार सुरू - २५८ 
गंभीर रुग्ण - १९ 
अहवाल प्रलंबित - ६६९ 
 

loading image
go to top