मुगट शिवारात वीज पडून एका महिलेचा मृत्यू; तीन महिला जखमी

मुगट शिवारात वीज पडून एका महिलेचा मृत्यू; तीन महिला जखमी
Summary

यावेळी अचानकपणे सोसाट्याचा वारा सुटला, आभाळ मोठे भरून आले व अचानक आलेल्या पावसामुळे व विजेचा कडकडाट झाला व वीज कोसळली.

मुदखेड (नांदेड) : मुदखेड तालुक्यातील (Mudkhed taluka) मुगट शिवारामध्ये (Mugat Shivara) रविवारी सकाळी शेतात काम करणाऱ्या महिला वादळवाऱ्यात सुटण्याच्या दरम्यान शेतामधील लिंबाच्या झाडाखाली बसले असता अचानकपणे विजेचा कडकडाट झाला व वीज कोसळली. दरम्यान या शेतामधील लिंबाच्या झाडाखाली बसलेल्या एका महिलेचा वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला तर इतर तीन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आली असल्याची माहिती हाती आली आहे. (a woman was killed in a lightning strike in mugat shivara in mudkhed taluka on saturday)

मुगट शिवारात वीज पडून एका महिलेचा मृत्यू; तीन महिला जखमी
नांदेड जिल्ह्यातील अंगणवाडी जिल्हा परिषद शाळांना होणार लिंक

मुदखेड तालुक्यातील मुगट येथे रविवारी सकाळी ९:३० ते१० च्या दरम्यान अवकाळी पाऊस विजेच्या कडकडाटासह पडला.  मुगट (ता.मुदखेड) शिवारातील मुगट रेल्वे स्टेशनजवळ एका शेतात मोठ्या कडकडाटासह वीज पडली. रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या एका शेतात लक्ष्मी वर्षेवार यांच्यासह इतर तीन महिला आपल्याच शेतात स्वामीची कनसे खुडण्याचे काम करत होत्या. यावेळी अचानकपणे सोसाट्याचा वारा सुटला, आभाळ मोठे भरून आले व अचानक आलेल्या पावसामुळे व विजेचा कडकडाट झाला व वीज कोसळली. कडकडाटामुळे लक्ष्मी व इतर सोबतच्या तीनही महिला लिंबाच्या झाडाखाली थांबल्या होत्या. त्यातील लक्ष्मी बालाजी वर्षेवार (अंदाजे वय२५) या महिलेच्या अंगावर वीज पडली व त्या जागीच मृत्यू पडल्या. 

त्यांच्या सोबत असणाऱ्या तीन महिला सुद्धा गंभीर जखमी झाल्या असून या सर्वांना मुदखेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये  उपचारासाठी  दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी नेल्यावर लक्ष्मी वर्षेवार यांना मृत घोषित करण्यात आले असून सोबतच्या तिनी महिलांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयांमध्ये हलविण्यात आलेले आहे. जखमी महिलेमध्ये इंदुबाई लोखंडे, रेणुका वर्षेवार, अर्चना मेटकर यांचा समावेश आहे. त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी यावेळी सांगितले.

मुगट शिवारात वीज पडून एका महिलेचा मृत्यू; तीन महिला जखमी
नांदेड : 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी जाताय; तर जाणून घ्या केंद्र

मुगट तालुका मुदखेड येथील शिवारामध्ये सदरील घटना घडल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळतात मुगट तलाठी सज्जाच्या तलाठी श्रीमती देशपांडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह सदरील घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला व अहवाल मुदखेडचा तहसीलदारांना दिला असल्याची माहिती यावेळी सांगण्यात आले. शासनाच्या निकषाप्रमाणे क्षतिग्रस्त परिवारास शासन स्तरावर आर्थिक मदत लवकरच मिळवून देऊ, असे आश्वासनही यावेळी तलाठी देशपांडे यांनी मयत कुटुंबाच्या परिवारास दिली आहे.

(a woman was killed in a lightning strike in mugat shivara in mudkhed taluka on saturday)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com