Nanded News : बारड पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खून प्रकरणातील फरारी आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गांजा, तलवार, खंजर आणि कार जप्त करण्यात आली.
नांदेड : बारड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील त्रिकूट येथे घडलेल्या खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून पाच लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.