
मारतळा : गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणेच्या उद्देशाने काही वाळू माफियांकडून एक बोट येळी शिवारात दाखल होताच महसूल पथकाने कारवाई केली होती. शनिवारी (ता.१४) सायंकाळी तहसीलदारांचे आदेशाप्रमाणे बोट जप्त करून दंडात्मक कारवाईसाठी उस्माननगर पोलिसांकडे ताब्यात दिली.