Mahur News : माहूर मध्ये ‘गैरहजर’ कर्मचाऱ्यांची ‘पंचायत’; गट विकास अधिकाऱ्यांकडून १३ कर्मचाऱ्यांना शो कॉज

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या भेटीत धक्कादायक प्रकार उघडकीस.
samadhan jadhav

samadhan jadhav

sakal

Updated on

माहूर (जिल्हा नांदेड) - जिल्ह्यापासून लांब पल्ल्याच्या ठिकाणी आदिवासी दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या माहूर पंचायत समिती मध्ये विनापरवानगी अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गटविकास अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेत आज (ता. ३०) १०.३० वाजता कार्यालय व कर्तव्यावर गैरहजर असलेल्या १३ कंत्राटी आणि नियमित शासकीय कर्मचाऱ्यावर कारवाई करत कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून, पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध एक दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com