esakal | कोरोना रोखण्यासाठी प्रशासकीय अधिकारी उतरले रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Administrative officials are working to prevent corona in the city of Dharmabad

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी (ता.१२) मार्च ते २१ मार्च पर्यंत सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याचे व इतर निर्बंध लागू केले आहेत.

कोरोना रोखण्यासाठी प्रशासकीय अधिकारी उतरले रस्त्यावर

sakal_logo
By
सुरेश घाळे

धर्माबाद (नांदेड ) : गेल्या बारा दिवसांपासून धर्माबाद शहरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक सुरू झाला असून आजपर्यंत ३७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार दत्तात्रय शिंदे व पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर उतरले असून विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच नागरिक व व्यापाऱ्यांना कोरोनाचे अटी व नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे.

नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी (ता.१२) मार्च ते २१ मार्च पर्यंत सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याचे व इतर निर्बंध लागू केले आहेत. सदरील निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी येथील उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार दत्तात्रय शिंदे, पोलिस निरीक्षक सोहन माछरे व नगरपालिका कर्मचारी यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून फिरत नागरिकांना व व्यापाऱ्यांना कोरोनाचे अटी व नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या नागरिकांना व शहरातील अनेक व्यापाऱ्यांना विनामास्क फिरत असल्यामुळे त्यांच्यावर पालिकेचे कर्मचारी दंडात्मक कारवाई केली आहे. व नागरिक, व्यापारी, कामगार, फळविक्रेते व भाजीपाला विक्री करणाऱ्या लोकांना चेहऱ्यावर मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

यावेळी तहसिलदार दत्तात्रय शिंदे, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक मोहनराव तुंगीनवार, बाबूराव केंद्रे, रूक्माजी भोगावार, सफाई विभाग प्रमुख अशोक घाटे, सुर्यकांत मोकले, किशन सोनकांबळे, भीमराव सुर्यवंशी, मनोज टाक, साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक साहेबराव नल्लेवाड, पोलिस नाईक हरीष मांजरमकर ट्राफिक पोलीस कर्मचारी माधव पाटील खतगावकर, शिवाजी सूर्यवंशी यांच्यासह पोलिस कर्मचारी व पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. 

 बंद असलेले कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी 

धर्माबाद शहरात गेल्या बारा दिवसांपासून कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. या बारा दिवसात येथील ग्रामीण रुग्णालयात २३० जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आली असून यापैकी ३० जण कोरोना बाधित आढळून आले. तर २४५ जणांची आरटीपीसीआर स्वॅब तपासणी करण्यात आली असून यापैकी ७ जण कोरोना बाधित आढळून आले. या सर्वांना होमक्वारंटीन करण्यात आले आहे. शहरातील माहेश्वरी भवन मधील कोविड सेंटर वरिष्ठांच्या आदेशानुसार (ता.२९) ऑक्टोंबर २०२० रोजी बंद करण्यात आले होते. शहरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक सुरू झाला असून बारा दिवसात एकूण ३७ जण कोरोना बाधित झाले आहेत. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे धर्माबादचे बंद असलेले कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी  शिवसेनेचे संघटक गणेश गिरी यांनी केली आहे.
 

loading image