ओल्या बाळंतीनीचा अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह, तामसा परिसरात खळबळ

file photo
file photo

तामसा (ता. हदगाव, जिल्हा नांदेड) : तामसा येथील शेतमजूरवाडी भागातील महिला मृत्यूनंतर पॉझिटिव आल्याची घटना मंगळवारी (ता. २८) स्पष्ट झाले असून शहर व परिसरात कोरोनाचा पहिला बळी गेल्यामुळे खळबळ उडाली आहे. अंदाजे २५ वर्षीय महिलेने सहा दिवसापूर्वीच सामान्य प्रसूतीद्वारे एका बाळाला जन्म दिला आहे. प्रसूतीपूर्वी व नंतरही सदरील माहिलेची, तिच्या बाळाची प्रकृती चांगली होती. त्यामुळे प्रसूतीच्या दुसऱ्याच दिवशी तिला येथील दवाखान्यातून डिस्चार्ज दिला होता. 

हदगाव तालुक्यातील आपल्या माहेरी गेली होती. दोन- तीन दिवसांपूर्वी तिची तब्येत खालावत गेली. त्यामुळे माहेरच्या मंडळींनी तिला हदगाव येथील दवाखान्यात दाखवून पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी (ता. २८) तिचे उपचारादरम्यान निधन झाले. डॉक्टरांनी तिचा स्वॅब नमुना घेतला. रात्री मयत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली. मयत महिला शेतमजूरवाडी मधील रहिवासी असून या भागात यापूर्वीच दोघेजण कोरोना बाधित झाले आहेत. यामुळे शेतमजूरवाडी भागातील नागरिक हादरले असून परिसरात भितीचे     वातावरण पसरले आहे. या भागातील अंदाजे ५० नागरिकांचे स्वॅब नमुने  घेण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिक व प्रशासनाची काळजी वाढली आहे. 

हेही वाचा नांदेडात भर दुपारी सराफा दुकानावर दरोडा, सराफा गंभीर, लाखोंचा ऐवज लंपास
  
नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून बाजारपेठेवर त्याचा परिणाम 

तामसा शहरात बुधवारपर्यंत दहा कोरोना बाधित रुग्ण निष्पन्न झाले असून अंदाजे दीडशे जणांचे स्वॅब नमुने घेण्याची प्रक्रिया चालू आहे. शहरातील तीन भाग कन्टेन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढू नये म्हणून ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन यांच्याकडून खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात येत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून बाजारपेठेवर त्याचा परिणाम जाणवत आहे. ग्रामीण भागातील नागरिक तामसा येथे विनाकारण येण्याचे टाळत असून केवळ कामासाठीच येथे येत आहेत.

प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, तहसिलदार जीवराज दापकर, नायब तहसीलदार जी. एस. हराळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक कदम यांनी स्थानिक प्रशासनाला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. तामसा येथील कोरोना बाधितांची प्रकृती सुधारत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच रंजना नारेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास बोंदरवाड यांनी केले आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com