esakal | चार दिवसांच्या रिमझिम पावसाने पाणीपातळीत वाढ, कुठे ते वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हिंगोली जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसाने पिकांना बहार आला आहे. मागील चार दिवसांपासून सुर्यदर्शन झालेले नाही.  

चार दिवसांच्या रिमझिम पावसाने पाणीपातळीत वाढ, कुठे ते वाचा...

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू असल्याने ढगाळ वातावरण आहे. यामुळे सुर्यदर्शन नाही. पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक झाला आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासात ८.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात मागील चोवीस तासात गुरुवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत ८.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडळनिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे हिंगोली मंडळात ९.५ मिलीमीटर, नरसी ४.५, सिरसम ७.५, बासंबा ७.८, तर डिग्रस व माळहिवरा निरंक आहे. खांबाळा मंडळात ४.९ एकूण ४.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कळमनुरी ९.३, वाकोडी ११.८, नांदापुर १.३, बाळापूर १७, डोंगरकडा १३.८, वारंगाफाटा २१.५ तर एकुण १२.५ मिलीमीटर पाऊस झाला. वसमत मंडळात सहा, आंबा ११.५, हयातनगर १०.८, गिरगाव ९.८, हट्टा ७.५, टेंभुर्णी ९.५, कुरूंदा ११.५ एकुण ९.५ मिलीमीटर पाऊस झाला.

रिमझिम पावसावर समाधान

औंढा मंडळात सहा, येहळेगाव ११.३, साळणा १२.३, जवळा १२, एकुण ७.९ मिलीमीटर, सेनगाव १५, गोरेगाव ८.८, साखरा ९.३, पानकनेरगाव ५.८, हत्ता ८.५ एकुण ७.९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी (ता.१०) पावसाची रिमझिम सुरु झाली गुरुवारी देखील ती कायम होती. रिमझिम पावसावर समाधान मानावे लागत आहे. या चार दिवसांत मोठा पाऊस झाला नाही. रात्रंदिवस तो रिमझिमच सुरू आहे.

हेही वाचा - नांदेड : कर्जमाफीचा जिल्ह्यातील एक लाख ४३ हजार शेतकऱ्यांना फायदा

शेतातील कामे खोळंबली

सध्या आश्लेषा नक्षत्र सुरू आहे मागच्या पुष्ष नक्षत्रात पाऊस क अत्यल्प झाला होता तर रविवारी (ता.दोन) पासून सुरू झालेल्या आश्लेषा नक्षत्रात काही दिवस वगळता सोमवारपासून (ता.१०) पाऊस सुरू झाला आहे. मात्र तो रिमझिम पडत आहे. हिंगोलीसह कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव, कळमनुरी तालुक्यात सर्वदुर हा पाऊस आहे. पावसाने पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र चार दिवसापासून शेतातील कामे खोळंबली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

येथे क्लिक कराजन्मदाता निष्ठूर झाल्याने मुलींवर आली ‘ही’ वेळ...

इसापुर व सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत वाढ
या पावसामुळे जिल्ह्यातील इसापुर व सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सध्या इसापुर धरणात ५५.१५ टक्के तर सिद्धेश्वर धरणात ८२.६२ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे विहिरी व बोअरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पिकांची परिस्थिती सुधारली आहे आज पहाटे पासून पालसाची रिमझिम सुरू असल्याने ढगाळ वातावरण कायम होते. 

संपादन - प्रल्हाद कांबळे