
अखिल भारतीय किसान सभा, आदिवासी राष्ट्रीय अधिकार मंच, आदिवासी संघर्ष समिती किनवट- माहूरच्या वतिने आदिवासी जमिनीच्या प्रश्नासाठी मागील तिन दिवसांपासून महामुक्काम आंदोलन सुरू होते. किनवट-माहूर तालुक्यात आदिवासींवरील अत्याचार वाढतच आहेत.
किनवट, (जि. नांदेड) : अखिल भारतीय किसान सभा, आदिवासी राष्ट्रीय अधिकार मंच, आदिवासी संघर्ष समिती किनवट- माहूरच्या वतिने आदिवासी जमिनीच्या प्रश्नासाठी मागील तिन दिवसांपासून महामुक्काम आंदोलन सुरू होते. किनवट-माहूर तालुक्यात आदिवासींवरील अत्याचार वाढतच आहेत.
हेही वाचा - परभणीच्या गिर्यारोहकांनी सर केला १४ हजार फुट उंचावरील हरकीदून पर्वत
विविध मागण्यांसाठी सुरू होते आंदोलन
अन्याय अत्याचाराच्या विरोधात सारखणीसह किनवट माहूर तालुक्यातील आदिवासींच्या हस्तांतरित जमिनीवरील अतिक्रमन हटवा, डोनीकर कुटुंबीयांच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण तत्काळ हटवा व अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे अतिक्रमण धारकांवर गुन्हे दाखल करा, कसत असलेल्या जमिनीचे पट्टे वाटप करा, उनकेश्वर येथील माधव गेडाम यांना मारहाण करून पिकाची नासाडी करणाऱ्या मांडवी वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करा व तत्काळ नुकसानभरपाई देऊन सहकार्य करा, निराळा येथील माजी सरपंच सुनील गेडाम यांना जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब जेरबंद करा, वनजमिनीची पट्टे द्या या मागणीसाठी हे महामुक्काम आंदोलन सुरू होते.
गगनभेदी घोषनांनी आंदोलनाची सांगता
आंदोलनाच्या मागण्या संदर्भात सहायक जिल्हाधिकारी उपविभागीय कार्यलय किनवट यांनी शिष्टमंडळाला चर्चा करुन वरील सर्व मागण्या निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले आणि सर्व मागण्या प्रशासन लववकर सोडवेल, असे सांगितल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. आंदोलनात विजयी सभा घेण्यात आली. सभेला संबोधित करतांना हे विजयाचे फलीत आदिवासींच्या एकजुटीने मिळाले, असे मत शंकर सिडाम यांनी व्यक्त केले. सभेला अर्जुन आडे, जनार्दन काळे यांनी संबोधित केले. लाल झेंडा जिदाबाद, आदिवासी एकता झिंदाबाद, लढेंगे- जितेंगेच्या गगनभेदी घोषनांनी आंदोलनाची सांगता करण्यात आली. या निर्णायक आंदोलनाचे नेत्तृत्व किसान सभेचे किसन गुजर, आदिवासी राष्ट्रीय अधिकार मंचचे शंकर सिडाम, शेतकरी नेते अर्जुन आडे, वसंत कोडमेते, गणपत मडावी, शेषराव ढोले, दादाराव टारपे, जनार्दन काळे, शंकर घोडके, प्रदीप जाधव, गंगाजी मेश्राम, परसराम पारडे, स्टॅलिन आडे, नंदु मोदुकवार, खंडेराव कानडे आदिंनी केले.
संपादन - स्वप्निल गायकवाड