सोयाबीन शेंगामधील बियाण्यांची उगवण समस्या व उपायाबाबत कृषि सल्ला 

प्रल्हाद कांबळे
Friday, 25 September 2020

या शेंगा वाळण्यासाठी व बियाणांमधील ओलावा कमी होण्यासाठी तापमान हे 30 ते 35 डिग्री सेल्सिअस प्रर्यंत असावे लागते. अर्दता ही 50 टक्यांपेक्षा कमी असावी लागते.

नांदेड  : जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि बदलेले हवामान याचा विपरीत परिणाम काही ठिकाणी सोयाबीन पिकावर दिसून आला आहे. सोयाबिनची पेरणी साधारणता 15 ते 30 जून दरम्यान झालेली असून आता हे पिक सध्या पकवतेच्या अर्थात सोयाबीनच्या शेंगा भरलेल्या अवस्थेत आहेत. या शेंगा वाळण्यासाठी व बियाणांमधील ओलावा कमी होण्यासाठी तापमान हे 30 ते 35 डिग्री सेल्सिअस प्रर्यंत असावे लागते. अर्दता ही 50 टक्यांपेक्षा कमी असावी लागते. याचबरोबर प्रखर सुर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश असावे लागते. सद्यस्थितीत तापमान 20 ते 25 डिग्री असून अद्रता ही 90 टक्यापेक्षा जास्त आहे. वातावरणही सतत ढगाळ आहे.

सदर स्थिती व वातावरण लक्षात घेता सोयाबिनच्या उभ्या पिकात शेंगामधील बियाणांची उगवण झालेली आहे. हे त्या बियाणाचे शारीरीक व्यंग असून सतत पडणाऱ्या पावसामुळे असा परिणाम झाला आहे. यावर कृषि आयुक्तालयाने उपाय सुचविले असून ते पुढील प्रमाणे आहेत. शेतामध्ये चर काढून पाण्याचा निचरा करावा व शेतामध्ये हवा खेळती ठेवावी. पाऊस थांबताच सोयाबिन पिकाची काढणी करुन काडाचे छोटे-छोटे ढिग करुन प्रखर सुर्यप्रकाशामध्ये शेतामध्येच वाळवावे. त्यानंतर प्रादुर्भाव/उगवण झालेल्या शेंगा बाजुला काढून मळणी करावी असे कृषि आयुक्तालयाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे.

हेही वाचा नांदेड - कोरोनामुळे मृत्यूचे सत्र थांबता थांबेना , गुरुवारी २३६ जण पॉझिटिव्ह, सात बाधितांचा मृत्यू

उद्योजकतेला चालना देणाऱ्या शासनाच्या विविध योजनांबाबत ऑनलाईन मार्गदर्शन

नांदेड : उद्योजकता धोरण आणि शासनाच्या उद्योजकतेबाबत चालना देणाऱ्या विविध योजनेविषयी शुक्रवार 25 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्राचे आयोजन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले असून या सत्रात महाव्यवस्थापक अमोल इंगळे हे मार्गदर्शन करणार आहेत.

या मार्गदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी Meeting URL: https://meet.google.com/thz-yweg-ovb   या लिंक वर क्लिक करावे. आपल्याकडे Google meet app यापूर्वी install केलेले नसेल तर install करून घ्यावे. आपण Google meet app मधून कनेक्ट झाल्यानंतर Ask to join वर क्लिक करावे. या सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनिटे वेळेपूर्वी जॉईन करावे. दिलेल्या लिंक मधून कनेक्टर झाल्यावर लगेच आपला व्हिडीओ व माइक म्युट बंद करावे. सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारावयाचे असल्यास माईक  सुरु करून विचारावे व लगेच  माईक बंद करण्याची दक्षता घ्यावी.

अधिक माहितीसाठी संपर्क जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड  02462-251674 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सहायक संचालक कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्र नांदेड यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agricultural advice on soybean seed germination problems and remedies nanded news