

Nanded News
esakal
अर्धापूर: ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरणात पाणी असूनसुद्धा ढिसाळ नियोजनामुळे सुमारे सहा ते आठशे हेक्टरवरील पिके वाळून जण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दीड महिन्यांपूर्वी पाणी सुटले होते. परंतु, आता केळी, ऊस, उन्हाळी ज्वारी आदी पिके पाण्याअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तातडीने पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.