
बाऱ्हाळी (जि.नांदेड) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विविध पक्षांतील नेते व कार्येकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करत आहेत. त्यामुळे पक्षाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निश्चितच फायदा होईल. पक्षात चांगले वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पक्ष प्रवेश करणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संधी देऊ, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.