शैक्षणिक बांधिलकी जोपासणारा अक्षर परिवार

file
file

नांदेड : सर्व शिक्षक आज चिमुकल्यांच्या भेटीसाठी आतुर झालेले आहेत. विद्यार्थी देखील तितकेच आपल्या आवडत्या शिक्षक शिक्षिका यांना पाहण्यासाठी भेटण्यासाठी, त्यांच्याकडून नवीन शिकण्यासाठी आतुर आहेत. पण ते शक्य नाही.  मात्र या संकटातही विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवायचे आहे. सुट्टी असूनही सर्व शिक्षकांनी  लर्निंग फ्रॉम होम या उपक्रमात मुलांपर्यंत नाना माध्यमातून पोचण्याचा प्रयत्न करत आहेत.   

सद्यस्थितीत ‘लर्निंग फ्रॉम होम’ या उपक्रमात सातत्य ठेवण्याची गरज आहे. कारण प्रत्यक्षात शाळा जरी भरली नाही तरी नवी पाठ्यपुस्तकं आलेली आहेत.  ती मुलांपर्यंत पोहोचवायची आहेत. ती कशी पोहोचवता येतील हे प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, सहकारी आणि गावातील शालेय व्यवस्थापन समितीची समिती यांनी ठरवायचे आहे. खरंतर शिकण्याचा आनंद हा वर्गात बसून शिक्षकांच्या तोंडून या पाठाचे स्पष्टीकरण शिक्षकांच्या त्यांच्या स्वतंत्र अशा अभिव्यक्ती कौशल्यातून पाठातील मूल्यं मुलांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवणं यासारखा खरा शिकण्याचा आणि शिकवण्याचा आनंद नाही. 

काय काय घडतं वर्गामध्ये? शंकांना लगेच उत्तरं मिळतात, चांगल्या उत्तराचं लगेच कौतुक होतं, शिक्षकांनाही आपण शिकवल्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा पटापट मुले देतात, तेव्हा एका निर्मिकाला सृजनाचा आनंद होत असतो. मात्र, आज शिक्षक या साऱ्यापासूनच दूर जात आहेत. पण काही काळच, पण हा काही काळ जर दीर्घकाळ झाला तर मात्र शिक्षकांचं काम कठीण होणार आहे, याची जाणीव असू द्यावी. कारण आज जरी शाळा उघडली नाही आणि प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन सुरू होऊ शकलेले नाही, तरीही दिलेले उद्दिष्ट शिक्षकांना पूर्ण करावंच लागणार आहे आणि हे उद्दिष्ट पूर्ण करताना चांगलीच दमछाक होणार आहे. 

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कसे शिकवावे? 
आपल्या पोटच्या मुलांना त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांनी जसं शिकवावं हे वाटतं, तसं आपण आपल्या शाळेतल्या मुलांना शिकवावं. साधं सोपं गणित. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांना तुमच्याशिवाय कोणीही नाही, हे कृपया लक्षात घ्या. त्यांचे आई वडील, पालक हे कष्टकरी आहेत, शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत. त्यांना आपल्या मुलांकडे, त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्यासाठी तितकासा वेळ नाही, किंबहुना त्यांना त्याचं फारसं महत्त्वही नाही. लेकरू घरी बसले तर कुठल्या तरी कामाला येईल अशा समस्यांमध्ये हे पालक असतात. उलट त्याचा घरच्या कामासाठी हातभार कसा लागेल हेही त्यांना आनंददायी वाटत असतं. त्यांच्याही मनात शिक्षणाबद्दल जागृती निर्माण करणं, पाल्याचे शिक्षण थांबू न देणं, त्याच्या शिकण्याच्या आनंदात खंड न पडू देणं हे आपलं काम मला ठाऊक आहे. 

‘अक्षर परिवार’ने जोपासली शैक्षणिक बांधिलकी
अक्षर परिवार खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्याप्रति असणारी शैक्षणिक बांधिलकी बाळगणारा परिवार आहे. परिवारातील सगळीच मंडळी अत्यंत उपक्रमशील तंत्रस्नेही आहेत. ही मंडळी समाजामध्ये शिक्षण आणि शाळा या दोन्हीमध्ये आपुलकी निर्माण करणारी खऱ्या अर्थानं समाजसेवी मंडळी आहे. मधल्या दोन महिन्यांमध्ये काही जणांनी उत्साहाने काम केलं. काहीजण मध्येच थांबले. मात्र फत्तेपुर शाळेच्या ‘लर्निंग फॉर्म होम’ या उपक्रमांमध्ये कधीही खंड पडला नाही.  

इतकंच म्हणायचं, की आपण जसं इतर कामं करताना कोरोनाला घाबरलो नाही,  काळजी घेऊन आपण ही सगळी कामं केली, तसेच आताही काळजी घेऊन आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये यासाठी काम करायचं आहे.  मला वाटतं आपण हे कुणीही अमान्य करणार नाही. लर्निंग फ्रॉम होम मध्ये आपण स्वतंत्रपणे एक ग्रुप तयार केला, तंत्रस्नेही अक्षर परिवार. खरंच कौतुक वाटतं तुम्हा सर्वांचं. या ग्रुपमधील साऱ्यांनीच तंत्र कौशल्य आत्मसात केलं आहे.  ते आत्मसात करून नवनव्या चाचण्या केल्या,  प्रश्नावल्या केल्या,  विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण चालू ठेवण्यासाठी मदत होईल अशा पद्धतीचं अध्ययन साहित्य आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं.  

तंत्रस्नेही अक्षर परिवार मध्ये खूप छान पुढाकार घेतला तो साधना बेंद्रे, रूपाली गोजवडकर, सीमा बोबडे, अक्षय ढोके, आणि युसुफ यांनी. आपण स्वतंत्र ब्लॉग तयार केला आणि सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टींची तयारी. केली साधना बेंद्रे यांनी पुढाकार घेऊन युट्युब चॅनल तयार केले. जगजित ठाकुरांनी मुलांना दररोज प्रशस्तीपत्र देऊन ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. बेबीसरोजा परबत, सपना शिंदे आदींनी नवं तंत्रज्ञान आत्मसात करून प्रश्नावली विकसित केलेल्या. 

शिक्षकांनी आजपासूनच कामाला लागवे
आॅनलाइन शिक्षण देताना मुलं थकणार, कंटाळणार नाहीत याची काळजी शिक्षकांनी घ्यावयाची आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांनी आजपासूनच नव्या तयारीने या कामाला लागाल असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून अभिनंदन, शुभेच्छा आणि धन्यवाद.
- व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com