
नांदेड : भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर सर्वपक्षीय खासदार असलेल्या शिष्टमंडळाने इतर देशांत जाऊन भारतीय सैनिकांच्या शौर्याचा पराक्रम सांगितला. या शिष्टमंडळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाही खासदार असताना या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने लग्नाची वरात गेल्याचे म्हणत खिल्ली उडवत अपमान केला.