
माहूर (जि. नांदेड) : शहरातील पौराणिक भोजंता तलावाशेजारी असलेल्या पुरातन भगवान शिवशंकर मंदिराच्या पायथ्याशी केलेल्या खोदकामात चतुर्मुखी गणेशमूर्ती आढळून आली. या मूर्तीची शिवमंदिराच्या ओट्यावर प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली असून, याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी केली.