Nanded : अंगणवाडी केंद्र मुलभूत सुविधांपासून वंचित

१७ अंगणवाडींना इमारतच नाही : शंभरच्यावर केंद्र वीज जोडणीविना
nanded
nandedsakal

अर्धापूर : चिमुकल्यांसाठी संस्कार केंद्र म्हणून महत्त्वाची भुमिका पार पाडणाऱ्या तालुक्यातील अंगणवाडी केंद्र मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. तालुक्यात १३८ अंगणवाडी केंद्र असून यापैकी ३८ केंद्राला विज जोडणी करण्यात आली आहे तर १७ ठिकाणी इमारत उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायत, किरायाच्या जागेवर अंगणवाडी केंद्र चालवावे लागत आहेत. तालुक्यातील २० ते ३० शौचालय नादुरुस्त झाले आहेत. या अंगणवाडी केंद्रांना तातडीने मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पालकांतुन केली जात आहे.

शहरासह ग्रामीण भागात राहणाऱ्या बालकांसाठी एकात्मिक बालविकास प्रकल्प राबविण्यात येतो. गावतील लोकसंख्येच्या प्रमाणात अंगणवाडी केंद्र मंजूर करण्यात येतात. या अंगणवाडी केंद्रातून विविध योजना राबविण्यात येतात. यात लसीकरण, माता बालसंगोपन, पोषण आहार, किशोरवयीन मुली, स्तनदा माता, गर्भवती महिला यासाठी योजना राबविण्यात येतात.

nanded
Nanded News : घरकुलांची होणार स्वप्नपूर्ती

या अंगणवाडी केंद्रातून बाल मनावर चांगले संस्कार केले जातात. पण सध्या हे अंगणवाडी केंद्र मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. तसेच आहार वाटप, परिसरात स्वच्छता याबाबत पालकांच्या तक्रारी आहेत.

nanded
Nanded News : जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा संप

तालुक्यातील अंगणवाडी केंद्रात मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करित असून ज्या गावात अंगणवाडी केंद्रला जागा नाही अशा गावात जागा उपलब्ध झाल्यावर अंगणवाडी केंद्र बांधण्यात येतील. तालुक्यात तीन सेविका व दोन मदतनीसच्या जागा रिक्त आहेत. लोकसहभागातून अंगणवाडी केंद्र सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- मयुरी पुणे, प्रकल्प अधिकारी.

अर्धापूर तालुक्यातील

  • अंगणवाडी केंद्राची परिस्थिती

  • एकूण अंगणवाडी केंद्र :१३८

  • इमारत नसलेले केंद्र:१७

  • सेविका रिक्त पदे:०३

  • मदतनीस रिक्त पदे:०२

  • विज जोडणी:३८

  • गॅस वाटप :७०

  • नादुरुस्त स्वच्छतागृह: २० ते ३०

  • एकूण लाभार्थी संख्या :८४३७

  • पर्यवेक्षिक:०५

  • बिट :०५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com