नांदेड : उद्योग केंद्राच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे मोठे उद्दिष्ट- अनिल कदम

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 2 December 2020

व्यवस्थापक अनिल कदम यांनी  महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती करीता आता भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे

नांदेड - कोरोना महामारीचा मुकाबला करत असताना भरीव निधी उपलब्ध नव्हता मात्र आजघडीला  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कौशल्य विकास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात  निधी उपलब्ध झाला असुन  पाच वर्षात तब्बल एक लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असुन  सुशिक्षित तरुणानी याकडे कल वाढविला पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अनिल कदम यांनी केले. ता. एक डिसेंबर पासून उद्योग केंद्राच्या माध्यमातून नव उद्योग व्यवसायाची उभारणीसाठी बँकेच्या वतीने लाभ मिळाला त्यांच्यासाठी प्रशिक्षण सुरू झाले.

यावेळी उपस्थित होते.  प्रास्ताविक मीटकान चे राहुल शेळके  यांनी केले. त्यात त्यांनी सहभागी लाभार्थी यांनी दिलेल्या वेळेवर उपस्थित राहणे, तसेच सहभागी होणारे तज्ञ प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन हे सर्व जणांना लाभदायी ठरणार असल्याचे सांगितले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला जवळपास ४०   लाभार्थी उपस्थित होते. ता. एक ते १२ डिसेंबर दरम्यान हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

व्यवस्थापक अनिल कदम यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती करीता आता भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. विविध योजनांचा समावेश यापुढे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग व्यवसायाची उभारणीसाठी त्यासोबतच तयार करण्यात आलेला माल विक्रीसाठी उपलब्ध बाजारपेठा उपलब्ध करून देणे यासाठी सुध्दा सहकार्य जिल्हा उद्योग केंद्र मोलाचे मार्गदर्शन करेल याची शाश्वती यावेळी कदम यांनी उपस्थित लाभार्थी यांना दिला. संचलन सय्यद अली तर आभार दिगंबर शिंदे यांनी मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anil Kadam aims to create jobs through Nanded Industries Center nanded news