esakal | चिंता वाढली : नांदेडात कोरोनाचा दहावा बळी 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

गेल्या सहा जून रोजी या वृध्द व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याची प्रकृती गंभीर होती. उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले.

चिंता वाढली : नांदेडात कोरोनाचा दहावा बळी 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : व्हेंटिलेटरवर असलेल्या इतवारा हनुमान चौक भागातील ६५ वर्षीय कोरोना बाधित वृद्ध व्यक्तीचा बुधवारी (ता.दहा) सकाळी सव्वा आठच्या दरम्यान विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय तथा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

गेल्या सहा जून रोजी या वृध्द व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याची प्रकृती गंभीर होती. उपचाराला प्रतिसाद दिला नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित व्यक्तींची एकूण संख्या १९५, तर दहा जणांचा मृत्यू , १३४ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, सध्या ५१ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू आहेत. बांधीतामध्ये मंगळवारी (ता. नऊ) रात्री उशिरा दोन नवीन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. यात नायगाव तालुक्यातील ताकबीड येथील ४७ वर्षीय पुरुष तर शहरातील चौफाळा भागातील एका ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. वरील दोन्हीही रूग्णावर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली. 

हेही वाचा- Video : यंदाचा गणेशोत्सव संकटात, मूर्तिकार अडचणीत ​

चौफाळा येथील महिलेची प्रकृती गंभीर​

नव्याने सापडलेल्या दोन्ही रूग्णांच्या निकटवर्तीय व संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले. रात्री उशिरा आलेल्या स्वॅब नमुने अहवालातील ताकबीड येथील पॉझिटिव्ह रूग्ण बाहेरगावाहून आल्याचे सांगण्यात येत आहे. तर चौफाळा येथील महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत.

हेही वाचा- Video : यंदाचा गणेशोत्सव संकटात, मूर्तिकार अडचणीत ​

मंगळवारी शाहुनगरात एक रुग्ण सापडला

मंगळवारी (ता. नऊ ) शाहूनगर परिसरातील ४१ वर्षे वयाच्या एका पुरुष बाधिताचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मुखेड कोविड केअर सेंटर येथील दोन बाधित व्यक्ती व पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील एक बाधित असे एकुण तीन रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत १९५ बाधितांपैकी १३४ बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून उर्वरीत ५१ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार चालू आहेत.

हेही वाचा- Video : व्यवसायास परवानगी द्या, अन्यथा भत्ता द्या, कोण म्हणतय? ते वाचा...​

रात्री उशिराने आले ११ स्वॅब अहवाल 

आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या नऊ झाली आहे. जिल्ह्यात बाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १३ बाधित व्यक्तींवर, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे ३८, माहूर ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर एक बाधित व्यक्तीवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरु आहेत. मंगळवार (ता.नऊ) रोजी ७९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी रात्री ११ च्या दरम्यान ११ अहवाल प्राप्त झाले यात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ६८ रुग्णांचा अहवाल बुधवारी (ता.दहा) सायकाळ पर्यंत येणार असल्याची शक्यता रुग्णालय सुत्राने सांगितले. 

रात्री ११ वाजता
प्राप्त अहवाल- ११
पॉझिटिव्ह- दोन
निगेटिव्ह -नऊ

आतापर्यंत:
-बाधित व्यक्तींची एकूण संख्या- १९५
- १३४ जणांना घरी सोडले
- ५१ जणांवर उपचार सुरू
- दहा बाधितांचा मृत्यू