
नांदेड : शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खरीप हंगाम 2021 मध्ये बियाणे विक्रेत्यांनी एक जूनपूर्वी शेतकऱ्यांना कापुस बियाण्याची विक्री करु नये. तर शेतकऱ्यांनी पण एक जुनच्या अगोदर कापुस बियाण्याची (Cotton seeds) शेतात लागवड करु नये. हंगामपूर्व कापसाची लागवड केल्याने शेंदरी बोंडअळीचा पुर्न: उत्पतीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामूळे विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना हंगामपुर्व बियाणे उपलब्ध करुन न दिल्यास व शेतकऱ्यांनी हंगामपूर्व (Farmer) लागवड न केल्यास शेंदरी बोंडअळीचा होणारा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. त्यामूळे शेतकऱ्यांनी हंगामपूर्व कापूस बियाण्याची लागवड करु नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी (district ari officer)नांदेड यांनी केले आहे. (Appeal to farmers: Cotton seeds should be planted after June 1 to control the outbreak of Shendari bollworm)
शेतकऱ्यांनी अनाधिकृत एचटीबीटी बियाण्याची खरेदी करु नये
नांदेड : खरीप हंगामात इतर राज्यातुन अनाधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे येण्याची शक्यता आहे. एचटीबीटी कापुस बियाण्याला राज्यात विक्रीची परवानगी नाही. शेतकऱ्यांनी या अनाधिकृत बियाण्याची लागवड करु नये. असे अनाधिकृत बियाणे बाळगल्यास कापुस बियाणे अधिनियम- 2009 व पर्यावरण सरंक्षण अधिनियम-1986 च्या तरतुदीनुसार पाच वर्षापर्यत कारावास व एक लाख रुपयाचा दंड होऊ शकतो. शेतकऱ्यांनी अनधिकृतपणे एचटीबीटी बियाण्याची खरेदी करु नये व त्या बियाणांची शेतात लागवड करु नये असे, आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
हेही वाचा - जिंतूर परिसरात तळपत्या उन्हात पाण्यासाठी वन्यजीवांची भटकंती
सध्या बाजारात परराज्यातून अनाधिकृत मार्गाने एचटीबीटी कापुस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एचटीबीटी कापुस बियाणे हे बोंडअळी प्रतिकार नसल्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. या कापुस बियाण्याच्या लागवडीमुळे तणनाशकांचा अनावश्यक वापर वाढुन जैव विविधतेला बाधा येऊन जमिन व मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या बियाण्यास उत्पादनासाठी अधिकृत मान्यता नसल्याने या बियाणे पुर्णपणे अनधिकृतरित्या उत्पादित केले जाते. तसेच या बियाण्याच्या सत्यतेची तपासणी कोणत्याही शासकीय यंत्रणेमार्फत केली जात नाही.
सुशिक्षित बेरोजगार अभियंतांना काम वाटप करण्यासाठी समितीची बैठक
नांदेड :-जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना लॉटरी पद्धतीने काम वाटप करण्यासाठी गठीत केलेल्या काम वाटप समितीची बैठक शुक्रवार 21 मे 2021 रोजी सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड येथे दुपारी 12 वाजता घेण्यात येणार आहे. इच्छुक सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी याची नोंद घेऊन आवश्यक त्या कागदपत्रासह बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन काम वाटप समितीचे अध्यक्ष तथा अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.