दिव्यांगमित्र संकेतस्थळावर केलेल्या अर्जदारांनी प्रत्यक्ष त्रुटीची पुर्तता करावी

प्रल्हाद कांबळे
Thursday, 15 October 2020

अशा लाभार्थ्यांनी पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांचे कार्यालयात प्रत्यक्ष जावून कागदपत्रांची पुर्तता करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी तेजस माळवतकर यांनी केले आहे.

नांदेड :- दिव्यांगमित्र संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज केलेल्या काही लाभार्थ्यांचे अर्ज अपूर्ण व त्रुटीत असल्याचे आढळून आली आहेत. अशा लाभार्थ्यांनी पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांचे कार्यालयात प्रत्यक्ष जावून कागदपत्रांची पुर्तता करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी तेजस माळवतकर यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेच्या स्वउत्पनातून दिव्यांग व्यक्तीचे कल्याण व पुर्नवसन करणे तसेच त्यांच्या वैयक्तीक कल्याणकारी योजनेसाठी 5 टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो. त्यात सन 2020-21 या वर्षासाठी दिव्यांगमित्र या संकेतस्थळावर ज्या लाभार्थ्यांना 5 टक्के स्थानिक निधीच्या लाभ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज पंचायत समिती, गटविकास अधिकारी स्तरावर केली होती. त्यातील बरेचसे लाभार्थ्यांचे अर्ज अपूर्ण व त्रुटीत असल्याचे आढळून आली आहेत. त्या लाभार्थ्यांनी अर्जाच्या त्रुटीची पुर्तता करुन परिपूर्ण अर्ज सादर करणार नाहीत त्यांची सर्वस्वी जवाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील असेही आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयाने केले आहे.

केळी पिकावरील किडबाबत सल्ला  

नांदेड : कृषी विभागामार्फत केळी पिकावरील किड व रोग सर्वेक्षण तसेच सल्ला प्रकल्पाचे काम सुरु असून केळी पिक संरक्षणासाठी पुढीलप्रमाणे कृषी संदेश देण्यात आला आहे. यात केळी पिकांवरील फुलकिडे नियंत्रणासाठी केळीचे घडावर व्हर्टीसिलियम लेकॅनी 3 ग्रॅम लि. अधिक एक मिली स्टीकर  किंवा निंबोळी अर्क 5 टक्के फवारणी करावी. केळीचे घड पॉलीप्रोपीलीन पिशवीने घट्ट झाकावे, असे आवाहन नांदेडचे उप विभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Applicants on the Divyangamitra website should rectify the actual error nanded news