

Nanded
esakal
लक्ष्मीकांत मुळे
अर्धापूर: तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीची प्रक्रिया सुरू झाली असून १४१ प्रभागातील सदस्यांचे आरक्षण सोडत काढण्यात आले आहे.या आरक्षण सोडतीत ओबीसी प्रवर्गाच्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सुमारे ३९ जागा घटल्या आहेत.तालुक्यातील लोणी खुर्द, पाटणूर, चनापूर निमगाव, आंबेगाव या पांच ग्रामपंचायतीत ओबीसी प्रवर्गासाठी शुन्य टक्के आरक्षण राहणार आहे.तर बामणी या ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील सदस्यांसाठी एकही जागा आरक्षित नाही.या आरक्षण सोडतीत खुल्या प्रवर्गातील सुमारे ४० जागा वाढल्या आहेत.