
नांदेड : ग्रामीण भागातील रहिवाशांना त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा मालकी हक्क मिळवून देणाऱ्या स्वामित्व योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण जीवनमानात मोठे परिवर्तन घडून येईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले.