
शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसले - देवेंद्र फडणवीस
नांदेड : विधानसभा २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या युतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. त्यावेळी युती असल्याने शिवसेनेलाही चांगल्या जागा मिळाल्या. शिवसेना-भाजपचे पूर्ण बहुमत आले. मात्र, शिवसेनेने या बहुमताचा अनादर करत भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. एवढेच नाही तर कपटाने सत्ता मिळवली, अशी कडकडीत टिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता.तीन) नांदेड येथे केले.
ज्येष्ठ नेते कै. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या प्रेरणास्थळ या स्मारकाच्या लोकाप्रण सोहळ्याप्रसंगी ते नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी ते पत्रकारांसोबत बोलत होते. याप्रसंगी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, भाजपाचे शहर महानगराध्यक्ष प्रवीण साले, वैद्यकीय आघाडीचे डॉ. अजित गोपछडे, चैतन्यबापू देशमुख यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले की, शिवसेना-भाजप युतीचा मागील विधानसभा निवडणुकीत मतदारांनी चांगला कौल दिला. त्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. शिवसेनेलाही चांगले यश मिळाले. मात्र, शिवसेनेकडून बहुमताचा अनादर केला गेला. एवढेच नाहीतर भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी तीन पक्षांची आघाडी करून कपटाने सत्ता मिळवल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर बोलण्याचे मात्र त्यांनी टाळले.
Web Title: Assembly Elections Held Bjp Shiv Sena Alliance Devendra Fadnavis
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..