नांदेडकर अथर्व उदावंत ठरला 'मिस्टर इंडिया'

मिस्टर इंडिया अथर्व उदावंत
मिस्टर इंडिया अथर्व उदावंत सकाळ

नांदेड : स्टार लाईफ प्रोडक्शनच्या वतीने ‘मिस्टर इंडिया’ स्पर्धा (Mister India Competition) घेतली जाते. या स्पर्धेत नांदेडचा (Nanded) फिटनेस मॉडेल (Fitness Model) म्हणून प्रथमच सहभागी झालेल्या अथर्व उदावंतने (Atharv Udawant) फिटनेस मॉडेल म्हणून देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे. ता. एक ते ता. पाच आॅगस्ट दरम्यान आग्रा येथे पार पडलेल्या या स्पर्धेसाठी देशभरातून ४५ मुले - मुली सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी अर्थवला मेंटर ग्रुमर म्हणून अजय तिवारी, श्‍वेता सिंघ चौधरी यांनी एक मॉडेल म्हणून बोलण्याची भाषाशैली, हावभाव, देहबोली, ग्रुप संभाषण, तर संजना सिंघ, दीपक बजाज व म्रनिका दत्ता यांनी तयार केलेले ड्रेस परीधान केले होते. या स्पर्धेत मुलांमध्ये कर्नाटकचा कौशिक राम हा पहिला तर मुलींमध्ये भोपाळची वर्षा डोंगरे पहिली आली आहे. नांदेडचा अथर्व दुसरा आला आहे. विशेष म्हणजे लॉकडाउन ( काळात ‘मिस्टर इंडिया’ स्पर्धा गाजवण्याचा अथर्वच्या मनात विचार आला.

मिस्टर इंडिया अथर्व उदावंत
Corona Updates : मराठवाड्यात २८६ जण कोरोनाबाधित, चौघांचा मृत्यू

पुढे त्याने वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ‘फिटनेस मॉडेल’ म्हणून सरावाला सुरुवात केली. त्यात कोरोनाचा अडसर येऊन कुठे स्पर्धा स्थगित होते की काय? अशी भीती असताना देखील अर्थवने सरावात कुठेही कसर सोडली नाही. दरम्यान, देशातील १९ मोठ्या शहरात स्टार लाईफ प्रोडक्शनच्या वतीने ‘मिस्टर इंडिया’ स्पर्धेसाठी आॅडिशन सुरु झाल्या. त्यात फेब्रुवारी मध्ये पुणे येथे अथर्वने यासाठी आॅडीशन दिले. तेव्हा या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. स्पर्धेत कुठेही कमी पडू नये म्हणून त्याने आहारतज्ज्ञ, डॉक्टर, जिम ट्रेनर, संवाद कौशल्य कला, मॉडेलींग फोटो शुट करणाऱ्या तज्ज्ञांचे सतत मार्गदर्शन घेत सराव केला. प्रोटीनयुक्त आहारावर विशेष लक्ष दिले आणि त्याची मेहनत फळाला आली. आज तो फिटनेस मॉडेल म्हणून देशभरात प्रसिद्ध होत आहे. देशातूनच नव्हे तर विदेशातील मॉडेलिंग क्षेत्रातील नामवंत मंडळीकडून त्याला कामासंदर्भात विचारणा होऊ लागली आहे. अटीतटीच्या स्पर्धेत अर्थवने दुसरा क्रमांक पटकवल्याने हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी विशेष कौतुक केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी देखील खासदार हेमंत पाटील यांनी अथर्वला शुभेच्छा दिल्या होत्या.

मिस्टर इंडिया अथर्व उदावंत
नीरज चोप्राची भालाफेकीत सुवर्ण कामगिरी; पाहा व्हिडिओ

मिस्टर इंडिया मॉडेलिंग स्पर्धा माझ्यासाठी खूप आनंद देणारी ठरली आहे. आज भले ही मी पहिला आलो नसलो तरी भविष्यात माझ्या रुपाने देशाला एक नवीन फिटनेस मॉडेल म्हणून चेहरा मिळेल, यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे.

- अथर्व उदावंत, मिस्टर इंडिया स्पर्धा विजेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com