बिलोली, नायगावात ‘कही खुशी कही गम’चे वातावरण

biloli.jpg
biloli.jpg


बिलोली, नायगाव (जि. नांदेड) ः तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण पंचायत समितीच्या सभागृहामध्ये उत्साहात पार पडले. या आरक्षणामुळे गावपातळीवरील निवडणुकांचे वातावरण रंगतदार ठरणार असून अनेक मातब्बर पुढाऱ्यांना पुन्हा गावाच्या माध्यमातून नेतृत्व करण्याची संधी लाभणार आहे. येथील पंचायत समितीच्या सभागृहात प्रभारी उपजिल्हाधिकारी तथा बिलोलीचे तहसीलदार कैलास चंद्र वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली नायब तहसीलदार आर.जी. चौहान यांनी तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर केले. मनाच्या सोडतीसाठी तालुक्यातील बहुसंख्य गावातील राजकारणी व विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

पुरुषांसाठी आरक्षित झाली 
लक्षवेधी निवडणुका होणाऱ्या कोल्हेबोरगाव, कासराळी, पिंपळगाव, आरळी, सावळी, सगरोळी, हिप्परगाथडी, केसराळी, आळंदी खतगाव, लोहगाव, गागलेगाव, हुनगुंदा, अर्जापूर, भोसी आदी बहुसंख्य गावांमध्ये सरपंच पदाचे आरक्षण चर्चेचा विषय बनला आहे. अनुसूचित जाती साठी असलेल्या सोळा ग्रामपंचायती पैकी बोरगाव थडी, हिंगणी दर्यापूर,बडूर, पिंपळगाव, आदमपूर, बेळकोणी बुद्रुक, आळंदी व खपराळा ही गावे अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाली आहेत. तर भोसी, बेळकोणी खुर्द, गुजरी बावलगाव कासराळी तोरणा, अर्जापूर व डौर जाती पुरुषासाठी आरक्षित झाली आहेत. 

मोर्चेबांधणी सुरू 
अनुसूचित जमाती साठी चार गावे असून बोळेगाव व कार्ला खुर्द ही महिलांसाठी तर थडीसावळी डोनगाव बुद्रुक ही गावे पुरुषांसाठी आरक्षित झाली आहे. नागरीकांचा मागास प्रवर्ग साठी २० गावे असून त्यापैकी दगडापूर, खतगाव, पोखरणी कांगठी शिंपाळा, लोहगाव,गंजगाव,हज्जापूर आरळी अटकळी ही दहा गावे महिलांसाठी तर येसगी, रामपूर थडी कोंडलापूर नाग्यापूर, सुलतानपूर, कुंभारगाव किनोळा सगरोळी कोल्हेबोरगाव तळणी व कोटग्याळ दौलापूर ही गावे पुरुषांसाठी सुटली आहेत. साधारण प्रवर्गासाठी ३३ गावे असून त्यापैकी सर्वसाधारण महिलांसाठी जिगळा, बाभळी, मिनकी, कामरसपल्ली, दौलातापुर,हरनाळा, लघूळ, नागणी, कार्ला बुद्रुक, कोळगाव, हुनगुंदा, गागलेगाव, रुद्रापूर, सावळी, केरूर, टाकळी, टाकळी खुर्द ही गावे आरक्षीत झाली आहेत. तर हिप्परगामाळ पाचपिपळी रामतीर्थ डोणगाव खुर्द, कौठा, माचनूर, चिटमोगरा, बिजूर, अंजनी, बामणी बुद्रुक, चिंचाळा, गळेगाव, हिप्परगाथडी, हरनाळी, ममदापूर, दुगाव, शिरली, टाकळी थडी आणि मुतन्याळ ही गावे पुरुषांसाठी आरक्षित झाली आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होताच गाव पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. 

१३ ग्रामपंचायतीची मुद्दत लवकरच संपणार 
नायगाव तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत (ता.१९) रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार गजानन शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. यात अनुसुचीत जातीसाठी १७, अनुसुचीत जमातीसाठी ४, इतर मागास प्रवर्गासाठी २२ आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३७ सरपंच पद आरक्षित झाले आहेत. विशेष म्हणजे नरसी, कुंटूर, होटाळा, देगाव यासह १६ गावचे सरपंचपद दुसऱ्यांदा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर बरबडा अनु. जमातीसाठी आरक्षित झाले आहे. नायगाव तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीपैकी ६७ ग्रामपंचायततीवर सध्या प्रशासक असून उर्वरीत १३ ग्रामपंचायतीची मुद्दत लवकरच संपणार असल्याने २०२५ पर्यंतच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात पार पडली. 


काहींना अनपेक्षित लाभ 
१४ व्या वित्त आयोगाच्या निधीमुळे २०१५ ला सुध्दा इच्छकांची मोठी संख्या होती, तर २०२० च्या आरक्षण सोडतीच्यावेळीही असंख्य इच्छुकांनी गर्दी केली होती. मागच्या दोन महिन्यांपासून गावात आकडेमोड करुन व मीच सरपंच होणार असल्याचा दावा करणाऱ्या काही इघ्छूकांचा हिरमोड झाला आहे, काहींना दुसऱ्यांदा संधी मिळाली तर काहींना अनपेक्षित लाभ झाला आहे. त्यामुळे आरक्षणाच्या सोडतीनंतर कही खुशी कही गम चे चित्र दिसून आले. मुदत संपलेल्या व लवकरच मुदत संपणार असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्याने सरपंच आरक्षण काढण्यात आले. या वेळी तहसीलदार गजानन शिंदे, नायब तहसीलदार नंदकिशोर भोसीकर, नवनाथ वगावाड, लोंढे यांची उपस्थिती होती. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com