Nanded News : गोळीबार प्रकरणाचा तपास एटीएसकडे मुख्य शूटरची ओळख पटली; दोघे अटकेत
Police Investigation : नांदेडमधील शहिदपुरा येथे १० फेब्रुवारीला घडलेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग करण्यात आला आहे. मुख्य शूटरची ओळख पटली असून, दोघांना अटक करण्यात आली आहे, यामध्ये महाराष्ट्राबाहेरचे काही आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
नांदेड : वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहिदपुरा येथे ता. १० फेब्रुवारीला सकाळी गोळीबाराची घटना घडली होती. याचा छडा लावत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, मुख्य शूटरची ओळख पटली आहे.