कापूस खरेदी केंद्रावर कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

लक्ष्मिकांत मुळे
Saturday, 21 November 2020


जिल्ह्यातील भोकर रोडवरील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा कापसाचा दर्जा ठरवून कापूस खरेदी करत नव्हते. पण तसेच कापूस परत पाठवत होते. बऱ्याचवेळा त्यांचे म्हणणे कुणीही ऐकून घेत नव्हते. शेवटी भाजपाचे अमोल कपाटे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच नागरीक व पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
 

नांदेड: जिल्ह्यातील भोकर रोडवरील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा कापसाचा दर्जा ठरवून कापूस खरेदी करत नव्हते. पण तसेच कापूस परत पाठवत होते. बऱ्याचवेळा त्यांचे म्हणणे कुणीही ऐकून घेत नव्हते. शेवटी भाजपाचे अमोल कपाटे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच नागरीक व पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

तीन ठिकाणी सुरू आहेत खरेदी केंद्र
नांदेड जिल्ह्यात भोकरफाटा, धर्माबाद, कुंटूर, आदी ठिकाणी सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली असून दि.१८ नोव्हेंबर पासून भोकरफाटा येथे सालासर जिनिंग मध्ये भारतीय कपास निगम लिमिटेडची खरेदी सुरू झाली आहे. 

हेही वाचा -  नांदेड : फुटाने विक्री करणाऱ्याचा मुलगा होणार डॉक्टर, निटमध्ये ७२० पैकी ६२५ गुण -

 

शेतकऱ्याच्या कापसामध्ये होत होती ग्रेडिंग
येळेगाव (ता.अर्धापूर) येथील एका शेतकऱ्याने गेल्या दोन दिवसांपासून भोकरफाटा येथील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणला होता. पण सदरील कापसामधील काही चांगला दर्जाचा कापूसच घेतो. आम्ही थोडाही खराब झालेला कापूस घेणार नाही. अशी तंबी देत शेतकऱ्याला कापूस परत घेऊन जाण्यासाठी सांगत होते.  शेतकऱ्यांनी विनंती करूनही ग्रेडिंग केली जात होती.

शेतकरी व भाजपा कार्यकर्ते झाले आक्रमक
वारंवार विनंती करूनही ऐकत नसल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाले.त्यावेळी येथील खरेदीही शेतकऱ्यांनी थांबवली.  तर भाजपा युवा मोर्चाचे माजी चिटणीस अमोल कपाटे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पण ऐनवेळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. अमोल कपाटे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कार्यवाही केली. यावेळी भाजपाचे भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख, प्रभू कपाटे, बाबुराव क्षीरसागर, दत्ता कपाटे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दुपारनंतर कापुस खरेदी सुरू...
आंदोलन व कार्यकर्त्याने आत्महदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्यानंतर सदरील कापूस खरेदी केंद्रातील कर्मचाऱ्यानी एक पाऊल मागे सदरील शेतकऱ्याचा कापूसही खरेदी केला. तसेच इतरही शेतकऱ्यांची खरेदी सुरू केली. सदरील खरेदी केंद्रावर बाराशे च्या वर शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून इतरही ठिकाणी कापूस खरेदी सुरू होईल असे सांगण्यात आले.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempt of self-immolation of a worker at a cotton shopping center