esakal | या शहरात साकारणार शांतीचे आकर्षक प्रतिक, कोणत्या ते वाचा..? 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

एवढेच नाही हे शांतीचे प्रतिक पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक आकर्षीत होतील. त्यासाठी तब्बल दहा कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. हा विषय नगरसेवक बापूराव गजभारे यांनी बैठकीत ठेवून त्याचा पाठपुरावा केला होता. 

या शहरात साकारणार शांतीचे आकर्षक प्रतिक, कोणत्या ते वाचा..? 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड वाघाळ शहर महापालिकेच्या वतीने येणाऱ्या काळात जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुध्द यांचा आकर्षक पुतळा साकरण्यास महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. एवढेच नाही हे शांतीचे प्रतिक पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक आकर्षीत होतील. त्यासाठी तब्बल दहा कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. हा विषय नगरसेवक बापूराव गजभारे यांनी बैठकीत ठेवून त्याचा पाठपुरावा केला होता. 

बुधवारी (ता. ३०) झालेल्या स्थायी समितीत अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये शहरात तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद ठेवण्यासही मंजुरी देण्यात आली. त्याच वेळी आसना नदीवरील जुन्या पुलाच्या कामालाही मंजुरी देण्यात आली आहे. या सभेत एकूण सत्तावीस   विषय ठेवण्यात आले होते. सभेत नगरसेवक अब्दुल रशीद गणी यांनी जुन्या निवेदनामध्ये वाढीव कामे समाविष्ट करून कार्यादेश देऊ नयेत असे आठ जून २०१८ चे परिपत्रक असताना हे काम वाढवून दिले जात आहे. ते कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याच वेळी यापूर्वी झालेल्या कामाला  तुम्ही स्थायी समितीत अधिकृत करुन घेत आहात हा प्रकार म्हणजे कार्योत्तर मान्यतेचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचाकोरोना : नांदेड जिल्ह्यात दीड लाख लोकांचे सर्वेक्षण

सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया वादात

महापालिकेच्या विविध विभागात सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पूर्वीच्याच दरानुसार ओम साई स्वयंरोजगार संस्थेला मुदतवाढ देण्याच्या ठरावात सभापती अमित तेहरा यांनी विरोध केला. या वाढीव काम देण्याच्या पाठीमागे कोणाचा तरी हात असल्याचे स्पष्ट होत आहे. या सुरक्षा रक्षकांना ठेवायचे असेल तर त्यांचे वेतन विभाग प्रमुखांच्या वेतनातून द्यावेत असे निर्देश दिले आहेत. 

सर्वे नंबर ३१ मधील दोन एकर जागेवर तथागत गौतम बुद्धांची मूर्ती 

यावेळी नगरसेवक बापूराव गजभारे यांनी सर्वे नंबर ३१ मधील दोन एकर जागेवर गोदावरी नदी किनारी तथागत गौतम बुद्धांची मूर्ती बसविण्यात ठेवलेल्या विषयास मंजुरी दिली आहे. या मूर्तीसाठी स्वतंत्र पाच कोटींची तरतूद करावी अशी मागणी श्री. गजभारे यांनी केली होती. त्यावेळी सभापती अमित तेहरा यांनी ही मूर्ती पाहण्यासाठी देशभरातील लोक नांदेडला आले पाहिजेत अशी भावना व्यक्त करून पाच नाही तर दहा कोटींची तरतूद करण्यात येत असल्याची घोषणा केली. या विषयाच्या चर्चेत राजू यन्नम, नागनाथ गड्डम यांनी सहभाग घेतला. या प्रस्तावाला ज्योती सुभाष रायबोले यांनी अनुमोदन दिले होते. या सभेत शहरातील आसना नदीवर असलेला जूना पूल बांधण्यासाठी आलेल्या निविदा प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली. त्यासाठी ६० लाख रुपयाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. 

येथे क्लिक कराकंधारमध्ये का केली महिलेनी आत्महत्या? वाचा सविस्तर...

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आभार

नगरसेवक बापूराव गजभारे यांनी सन २०१८ च्या महापालिकेच्या सर्व साधारण सभेत ठराव क्रमांक ५२ ठेवला होता. तत्कालीन पालकमंत्री यांनी या विषायाला गती दिली. ही मुर्ती गोदावरी नदी पात्रात बसविण्याचे ठरले होेते. मात्र त्याला परवानगी लवकर मिळत नसल्याने गोदावरीच्या काठावर दोन एकर जागेमध्ये ही मुर्ती बसविण्यात येणार असे ठरले होेते. त्यावरुन गुरुवारी हा विषय जवळपास मार्गी लागला. पालकमंत्री अशोक चव्हाण या कामासाठी स्वत: आग्रही होते. श्री. गजभारे यांनी अशोक चव्हाण, माजी मंत्री डी. पी.सावंत यांचे आभार मानले. 

- बापूराव गजभारे, नगरसवेक तथा पिरीपीचे उपाध्यक्ष, नांदेड.