पर्यावरण रक्षणासाठी महिलाशक्तीचा जागर

प्रसादाच्या स्वरुपात शंभर महिलांना सीताफळाच्या रोपांचे वाटप
पर्यावरण रक्षणासाठी महिलाशक्तीचा जागर
पर्यावरण रक्षणासाठी महिलाशक्तीचा जागरsakal

नांदेड ः मालेगाव येथील वृक्षमित्र परिवार व भगवती दुर्गा महोत्सव मंडळ बसवेश्वरनगर यांच्या वतीने आयोजित जागर पर्यावरण समृद्धीचा या उपक्रमात महिलांनी पर्यावरण रक्षणाचा निर्धार केला. तसेच प्रसादाच्या स्वरुपात १०० महिलांना सीताफळाच्या रोपांचेही वाटप करण्यात आले आहे.

यावेळी परसबागेला जैविक खताद्वारे समृद्ध करण्याचे उपाय व कचर्‍यात जाणार्‍या प्लास्टिकचा भस्मासूर रोखण्यासाठी इको ब्रीक्सची निर्मिती करण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. वृक्षमित्र संतोष मुगटकर, गोदावरी नदी संसदच्या समन्वयक चंदा महेश काबरा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उद्यान अधीक्षक प्रीतम भराडिया, वृक्षमित्र फाऊंडेशनच्या संध्या मुगटकर यांनी ग्रामीण महिलांना पर्यावरणाचे रक्षण करण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

पर्यावरण रक्षणासाठी महिलाशक्तीचा जागर
Power Crisis: कोळसा, रेल्वे आणि ऊर्जा मंत्रालयानं स्थापन केला 'आपत्ती गट'

भगवती दुर्गा महोत्सव मंडळाचे अध्यक्ष अंबादास बाचेवार, उपाध्यक्ष मनोज आवर्दे, सचिव प्रभाकर राजेवार, रेखा स्वामी, आशा केशेवार, अनुसया राजेवार व गोदावरी बाचेवार यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. दुर्गा महोत्सवाच्या प्रसादाच्या स्वरुपात १०० महिलांना यावेळी सीताफळाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. या रोपांचे योग्य पद्धतीने संगोपन करून मालेगावचा परिसर हरितरम्य करण्याचा निर्धार यावेळी महिलांनी व्यक्त केला.

सूत्रसंचालन अशोक स्वामी यांनी केले. आभार जितेंद्र राजेवार यांनी केले. यशस्वीतेसाठी ईश्वर पाटील, सुनील मिरजकर, शेषराव राजेवार, डॉ.जीवन जोशी, डॉ.देलमडे, डॉ.साहेबराव इंगोले, मनोहर खंदारे, प्रा.श्रीहरी खुर्दामोजे, प्रा.बसवेश्वर राजेवार, दुर्गादास चौरे, ओमेश पांचाळ, गणपतराव आवर्दे तसेच भगवती मंडळ व जय जिजाऊ फाऊंडेशनच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com