पावसाळ्यातील आजारांपासून काळजी घेणे आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aware Rainy season disease

पावसाळ्यातील आजारांपासून काळजी घेणे आवश्यक

नांदेड : मॉन्‍सून कालावधीत पाऊस, गर्मी व दमटपणा यामूळे डासांना पोषक वातावरण तयार होऊन डासांची उत्‍पत्‍ती मोठ्या प्रमाणात होते. त्‍यामूळे किटकजन्‍य व जलजन्‍य आजार होतात. त्यासाठी पावसाळ्यात नागरीकांनी आपल्‍या आरोग्‍याची काळजी घेणे आवश्‍यक असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी सांगितले आहे.

पाणी हेच जीवन असे संबोधले जाते. मानवी जीवनात स्‍वच्‍छ आणि शुध्‍द पाण्‍याचे महत्‍व अन्‍यन साधारण आहे. असुरक्षित पिण्‍याचे पाणी व अस्‍वच्‍छ परिसर यामुळे समाजात आरोग्‍याच्‍या प्रमुख समस्‍या उद्भवतात. पाण्‍याची गुणवत्‍ता हा सुरक्षित पाणी पुरवठ्यासाठी सर्वात महत्‍वाचा घटक आहे. गावातील परिसर व वैयक्तिक स्‍वच्‍छतेची स्थितीही पाण्‍याच्‍या गुणवत्‍तेसाठी प्रामुख्‍याने जबाबदार असते. काही वेळा स्‍त्रोतामधून मिळणारे पाणी योग्‍य गुणवत्‍तेचे नसते. प्रथमतः स्‍त्रोताच्‍या पाण्‍याची गुणवत्‍ता समजून घेणे आवश्यक आहे.

अशी घ्यावी काळजी

जलजन्‍य व किटकजन्‍य आजारापासून बचावा करीता व प्रतिबंधाकरीता नागरीकांनी टि.सी.एल.व्‍दारे निर्जंतूक केलेलेच पाणी पिण्‍यासाठी वापरात आणावे. उघड्यावरचे अन्‍न पदार्थ, शिळे अन्‍न खाणे टाळावे, हात साबनाने धुतल्‍यानंतरच अन्‍नपदार्थ खावेत, उघड्यावर शौचास जाणे टाळावे, पिण्‍याच्या पाण्‍याच्‍या स्‍त्रोताचा सभोवतालचा परिसर स्‍वच्‍छ राहील याची दक्षता घ्‍यावी. आपण राहत असलेल्‍या परिसरातील साठलेल्‍या पाण्‍याचे डबके बूजवून घ्‍यावेत व परिसरात गटारे तुंबणार नाहीत याबाबत दक्षता घ्‍यावी, घर परिसरात टायर, नारळाच्‍या करवंट्या,फुलदाण्‍या,कुलर,रिकामी पिंपे यामध्‍ये पाणी साचू देवू नये, आठवड्यातून एक दिवस (शनिवार) कोरडा दिवस म्‍हणून पाळावा असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले आहे.

पावसाळ्यात होणा-या आजारापासून सुरक्षिततेसाठी पाच वर्षांखालील बालकांसाठी अतिसार नियंत्रण पंधरवाडा एक ते १५ जुलैपर्यंत साजरा करण्‍यात येत आहे. यामध्‍ये आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्‍य कर्मचारी यांचे मार्फत घरोघरी जावून सर्वेक्षण करण्‍यात येणार असून हगवण व अतिसाराने आजारी बालकांकरीता ओ.आर.एस. पावडर व झिंक गोळ्याचे वाटप होणार आहे.

- डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड

Web Title: Aware Rainy Season Disease Health Department Appeal Survey

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top